ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे तो मर्यादित षटकांच्या आणि कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनुपस्थित आहे. असे असले तरी तो सोशल मीडियावर मात्र जोरदार सक्रिय आहे. त्याने सुपरस्टार सलमान खानच्या एका सिनेमाचा ट्रेलर एडिट करून त्यात आपला चेहरा लावून तो व्हिडिओ शेअर केला. याव्यतिरिक्त त्याने रजनीकांत, प्रभास, चिरंजीवी, शाहरुख खान, सूर्या यांसारख्या अनेक सुपरस्टार अभिनेत्यांचे व्हिडिओही एडिट करून शेअर केले आहेत.
शनिवारी (१२ डिसेंबर) बॉलीवूडमधील चित्रपट ‘सुलतान’चा ट्रेलर एडिट करून सुपरस्टार सलमान खानच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लावून व्हिडिओ शेअर केला.
https://www.instagram.com/p/CIsQQZhlEbD/?utm_source=ig_web_copy_link
‘नरसिम्हा’ च्या भूमिकेत वॉर्नर
यापूर्वीही त्याने अनेक वेळा अशाप्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वी त्याने अभिनेता चिरंजीवीचा सिनेमा ‘साई रा नरसिम्हा रेड्डी’चा व्हिडिओही एडिट केला आहे. यामध्ये त्याने चिरंजीवीच्या चेहऱ्याच्या जागी आपला चेहरा लावला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/p/CIpusZVlYG1/?utm_source=ig_web_copy_link
‘रोबोट’ मध्ये रजनीकांतच्या चेहऱ्याच्या जागी लावला आपला चेहरा
दुसरीकडे तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटाच्या एडिटेड व्हिडिओतही दिसला होता. वॉर्नरने व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये त्याने रजनीकांत यांचा चेहरा काढून आपला चेहरा लावला होता.
https://www.instagram.com/p/CInE2z7lMyy/?utm_source=ig_web_copy_link
शाहरुख खानचाही व्हिडिओ केला एडिट
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘अशोका’चा व्हिडिओही वॉर्नरने एडिट करून आपला चेहरा लावला होता. याव्यतिरिक्त त्याने प्रभासचा ‘रेबेल’ आणि सूर्याचा ‘टाईम स्टोरी’ सिनेमांचेही व्हिडिओ एडिट केले होते.
https://www.instagram.com/p/CIh7SiiF45i/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नरला ग्रोईनची दुखापत
वॉर्नर भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तिसरा वनडे आणि पुढील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेलाही तो मुकला होता. तो सध्या या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही वॉर्नर १७ डिसेंबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
आधीपेक्षा आता चांगले वाटत आहे- वॉर्नर
आपल्या दुखापतीबद्दल बोलताना वॉर्नरने म्हटले होते की, “मला पूर्वीपेक्षा चांगले वाटत आहे. मला सिडनीमध्ये राहून आपल्या फीटनेसवर काम करायचे आहे. माझ्या संघसहकाऱ्यांची अशी इच्छा आहे की मी कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे ठीक झालो पाहिजे. मला पळताना त्रास होतोय.”
वॉर्नरच्या अनुपस्थितीत टी२० मालिका भारताच्या खिशात
कसोटी मालिकेपूर्वी भारताने सुरुवातीच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ने विजय मिळवला होता, तर वॉर्नरच्या अनुपस्थितीत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू लपवा आणि पळा! बिग बॅश लीग सामन्यादरम्यान घडली मजेशीर घटना, पाहा व्हिडिओ
बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल
“भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज”, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य
“केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करण्यासही तयार”, विंडीजच्या दिग्गजाने केली स्तुती