---Advertisement---

बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल

On: शनिवार, डिसेंबर 12, 2020 11:43 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची होणारी पत्नी प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती फोटो, आपल्या डान्सचे व्हिडिओ अपलोड करत चाहत्यांशी संवाद साधत असते. आता ती पुन्हा एकदा आपल्या एका डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

धनश्री वर्माने नुकताच आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर आपल्या डान्सचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रॅपर बादशाहच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तिने अप्रतिम डान्स स्टेप्स केल्या आहेत. काही मिनिटांतच या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत मिळाली व सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CInjYTXJOZk/?utm_source=ig_web_copy_link

धनश्री ही व्यवसायाने कोरिओग्राफर आणि डान्सर आहे. तिने ९ ऑगस्ट २०२० ला चहलसोबत साखरपुडा केला होता. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली होती. तरीही, आतापर्यंत त्यांनी लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही.

चहलने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे व टी२० मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. कसोटी संघात स्थान न मिळाल्याने चहल लवकरच भारतात परतणार आहे

महत्त्वाच्या बातम्या-

कसं काय, हार्दिक भाऊ? पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल

इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर

ट्रेंडिंग लेख-

ब्रॅडमन यांचा ‘तो’ विक्रम आपल्या मराठमोळ्या भाऊसाहेब निंबाळकरांनी तेव्हाच मोडला असता, पण…

…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---