मुंबई । इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी -20 मालिका शुक्रवारपासून (4 सप्टेंबर) सुरु झाली. पहिला सामना रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेल्या या थरारक सामन्यात इंग्लंडने दोन धावांनी विजय मिळवला. सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने दिलेले 163 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.
एकेकाळी असे वाटले होते की, ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या आठ षटकांत सामना पूर्णपणे उलटला. डेव्हिड वॉनरची तुफानी खेळी ऑस्ट्रेलियाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
इंग्लंडच्या संघाने 163 धावांचे लक्ष्य दिले
या सामन्याआधी इंग्लंडच्या संघाने टी -20 मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 162 धावा केल्या. संघाचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने 29 चेंडूत 44 धावा केल्या तर डेव्हिड मालनने 66 धावा केल्या. या दोघांशिवाय कुणालाही मोठा डाव खेळता आला नाही किंवा कोणतीही मोठी भागीदारी रचता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन आगर, ग्लेन मॅक्सवेल आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने नेत्रदीपक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर (58), एरॉन फिंच (46) यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. यांची भागीदारी पाहून असे दिसत होते की ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल पण तसे झाले नाही. या दोघांनंतर स्मिथने 18 धावांची खेळी केली. तथापि, ऑस्ट्रेलियाने पुढच्या 14 चेंडूत चार विकेट गमावल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर मार्क वूड यांनी एक गडी बाद करण्यात यश मिळवले.
19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एश्टन एगार धावबाद झाल्यानंतर स्टॉयनिस शेवटचे षटक खेळू लागला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. टॉम करनने शेवटचे षटक टाकले. मार्कस स्टॉयनिसने पहिला चेंडू निर्धाव खेळला. पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. पुन्हा तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यांनंतर शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पाच धावांची आवश्यकता होती, पण ते फक्त दोन धावा करू शकले. या सामन्यात इंग्लंडने विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन आयपीएल संघ करणार होते त्याला आपल्या ताफ्यात सामील, परंतू बोर्डाने घातला खोडा
बीसीसीआयने माजी दिग्गज खेळाडूला दिला धक्का; आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिले नाही स्थान
या खेळाडूंच्या जर्सीवर दारूची जाहिरात पाहून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भडकले
ट्रेंडिंग लेख –
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी