fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी

September 5, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल २०२० चे आयोजन युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होणार आहे. आयपीएलच्या या १३ व्या सत्रासाठी सर्व संघ तयारी करत आहेत. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सर्व खेळाडूंमध्ये उत्साह दिसून येत आहे.

यावेळी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंसोबतच युवा प्रतिभावान खेळाडू देखील आहेत. या हंगामात काही खेळाडू वर्षानुवर्षे खेळत आले आलेत तर काही पहिल्यांदाच खेळतील.

सर्व संघातील अनुभवी आणि युवा खेळाडू यांच्यातील प्रतिभा बघता कोणत्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल हे सांगणे कठीण आहे. तर या लेखात अशा ५ दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना कदाचित अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.

या ५ दिग्गज खेळाडूंना सामना खेळण्याची संधी क्वचितच मिळेल-

अजिंक्य रहाणे – दिल्ली कॅपिटल

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे कसोटीमधील एक सर्वोत्तम खेळाडू आहे, परंतु त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यात जास्त संधी मिळाली नाही. अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघात खेळत होता. यावेळी तो दिल्ली कॅपिटल संघाचा भाग झाला आहे.

अजिंक्य रहाणेच्या आगमनाने दिल्ली कॅपिटल संघाला एक अनुभवी खेळाडू मिळाला, परंतु दिल्ली कॅपिटलच्या संघात दिग्गज आणि युवा खेळाडू आहेत. दिल्ली संघात शिखर धवन, पृथ्वी शॉच्या रूपात दोन सलामीवीर आहेत. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत कदाचित रहाणेला संपूर्ण हंगाम न खेळता बेंचवर बसून काढावा लागेल असे दिसते.

मोहम्मद नबी – सनरायझर्स हैदराबाद

आयपीएलमध्ये अफगाणिस्तान संघाचे दोन स्टार खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघामध्ये रशीद खानसह २०१७ च्या मोसमात मोहम्मद नबीनेही प्रवेश केला होता. त्यानंतर मोहम्मद नबीला फारशी संधी मिळाली नाही पण जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने आपले कौशल्य दाखविले.

या संघात सर्वोत्कृष्ट परदेशी खेळाडू आहेत. तसेच आयपीएलमध्ये अंतिम अकाराच्या संघात केवळ ४ परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. त्यात सनरायझर्स हैदराबाद संघात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, रशीद अशा स्टार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद नबीसाठी कदाचित आयपीएलचा हा हंगाम न खेळता संपेल.

ऍरॉन फिंच – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच २०१० पासून आयपीएल खेळत आहे. आरोन फिंचने सातत्याने आयपीएलमध्ये खेळल्यानंतरही त्याने आपल्या नावाप्रमाणे कामगिरी केली नाही. फिंच हा एक जबरदस्त फलंदाज आहे आणि यावेळी तो आरसीबीच्या संघाकडून दिसेल. परंतु तसे पहिले तर या संघात फलंदाजीचे बरेच पर्याय आहेत. त्याचमुळे फिंचसाठी संघात स्थान मिळणे कठिण आहे. एवढेच नाही तर ४ परदेशी खेळाडूच एका संघात खेळू शकत असल्याने हा नियम देखील कदाचित फिंचसाठी धोकादायक ठरु शकतो.

डेल स्टेन – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान स्टार गोलंदाज डेल स्टेनची वेगवान गोलंदाजी सर्वोत्कृष्ठ आहे. गेल्या काही वर्षात डेल स्टेन दुखापत व तंदुरुस्तीच्या समस्येमुळे त्रस्त आहे, परंतु त्याने क्रिकेट विश्वात स्वत: ला सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये डेल स्टेनचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे काही सामन्यानंतर स्टेनला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागावी होती.

यावेळी आरसीबीचा ख्रिस मॉरिस गोलंदाजांमधील एक उत्तम पर्याय आहे. तसेच तो फलंदाजीही करु शकतो. तर या खेरीज भारतीय गोलंदाजही खूप चांगले आहेत. अशा परिस्थितीत डेल स्टेनला आरसीबीच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळविणे खूप कठीण जाईल.

ट्रेडिंग लेख –

आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा

३ असे भारतीय दिग्गज, ज्यांनी केल्यात कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक

धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…

इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त


Previous Post

एका गोलंदाजाला आयपीएल खेळण्यावर बंदीसह आयपीएलच्या आजच्या ५ ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

Next Post

एका आयपीएल संघाचा मालक आहे पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तीचा पणतू

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Next Post

एका आयपीएल संघाचा मालक आहे पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तीचा पणतू

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.