नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने नुकतेच आपल्या १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला राम राम ठोकत निवृत्तीची घोषणा केली. त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. धोनीला सामना संपविण्याच्या आणि शांत राहून संघ सांभाळण्याच्या कलेमुळे सर्वोत्तम खेळाडूंच्या वर्गात उभे केले गेले. तरीही भारतीय संघासाठी सामना फिनिशर बनण्याची त्याची कला माजी कर्णधार सौरव गांगुलीने ओळखली होती.
माजी कर्णधार गांगुलीच्या म्हणण्यानुसार धोनीला २००४ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. तसेच २००५ मध्ये कसोटी सामन्यात धोनीला संधी मिळाली होती, आतापर्यंत असे म्हटले जात आहे. परंतु त्याच वेळी, माजी भारतीय क्रिकेट प्रशिक्षक जॉन राईट यांनी धोनीच्या पदार्पणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
राईट यांनी सांगितले की, “माजी कर्णधार सौरव गांगुलीने २००४ साली पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये एमएस धोनीला घेण्यास पसंती दर्शविली होती. परंतु धोनी संघात येऊ शकला नाही.”
धोनीच्या निवडीवर जॉन राईट यांचा खुलासा
जॉन राईट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “सौरव गांगुली पाकिस्तानच्या दौऱ्यावर धोनीच्या पदार्पणाबाबत इच्छुक होता. त्या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पार्थिव पटेलने आणि द्रविडने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत यष्टीरक्षण केले होते.”
राईट यांनी पुढे सांगितले की, “२००४ च्या पाकिस्तान दौऱ्यात धोनीने जवळजवळ स्थान बनविले होते. गांगुलीला कोणत्याही स्थितीत तो संघात हवा होता, पण धोनी संघात येण्यापासून थोडक्यात चुकला.” पाकिस्तानमध्ये खेळली गेलेली कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली आणि वनडे मालिका ३-२ ने जिंकली होती.
धोनीला पाहून गांगुली झाला होता प्रभावित
जॉन राईट यांनी मुलाखतीत सांगितले की, “धोनी २००४ साली राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला होता. गांगुली त्याच्याबद्दल नेहमी चांगले बोलत असे.”
“मीदेखील धोनीचे नाव गांगुलीच्याच तोंडातून ऐकले. धोनीने पाकिस्तान दौऱ्यावर पदार्पण केले नाही. परंतु २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली. यानंतर डिसेंबर २००५ मध्ये तो कसोटी संघाचा भाग बनला. येथून धोनीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्याची कारकीर्द एक महान कर्णधार म्हणून संपली.”
एमएस धोनी आहे भारताचा एक महान कर्णधार
एक कर्णधार म्हणून धोनीने अनेक जागतिक विक्रम केले. त्याने २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून दिली.
याशिवाय धोनीने ९० कसोटी सामने खेळताना ४८७६ धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये ३५० सामन्यात त्याने ५० पेक्षा अधिकच्या सरासरीने १०७७३ धावा केल्या. सोबतच टी२० मध्येही ९८ सामने खेळताना ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
-दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
-आयपीएल २०२०: अशी असेल दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यातील श्रेयस अय्यरची पलटण
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
-युएईमध्ये खेळताना आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ दिग्गज
-वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज