---Advertisement---

आयपीएल २०२०: अशी असेल दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यातील श्रेयस अय्यरची पलटण 

On: शुक्रवार, सप्टेंबर 4, 2020 6:02 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यासाठी आता १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू जोरदार तयारी करत आहे. अशात यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली दिल्ली संघ पूर्णपणे संतुलित असल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासाविषयी बोलायचे झाले तर, त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले नाही. शिवाय ते एकदाही आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारु शकले नाहीत. मात्र, यंदा युवा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबरोबर संघात अनेक अनुभवी खेळाडूही उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या यंदा ट्रॉफी पटकावण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

अशात दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या आयपीएल सामन्यात त्यांचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ कसा असेल, याची सर्वांना उत्सुकता लागली असेल. या लेखात, आम्ही दिल्ली कॅपिटल्सच्या संभावित प्लेइंग ११ संघाचा आढावा घेतला आहे.

असा असेल दिल्ली कॅपिटल्सचा संभावित प्लेइंग इलेव्हन संघ (Delhi Capitals Playing XI Team) –

१. शिखर धवन 

सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी करताना अनेक दमदार खेळी केल्या आहेत. त्याच्यातील फलंदाजी क्षमतेला पाहता कर्णधार श्रेयस अय्यर त्याला केवळ पहिल्या सामन्यातच नव्हे तर आयपीएलच्या पूर्ण हंगामात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देईल. धवनची आतापर्यंतची आयपीएल आकडेवारी शानदार राहिली आहे. त्याने १५९ सामने खेळत ३३.१७च्या सरासरीने ४५७८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.

२. पृथ्वी शॉ 

शिखर धवनसोबत दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याची सुरुवात करण्याची जबाबदारी युवा फलंदाज पृथ्वी शॉवर असेल. गतवर्षी त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत एकूण १६ सामने खेळले होते. दरम्यान त्याने २ अर्धशतकांसह ३५३ धावा केल्या होत्या. त्याचे आयपीएल शतक केवळ एका धावेने हुकले होते. त्यामुळे हा फलंदाज आयपीएलच्या तेराव्या हंगामात अजून दमदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.

३. अजिंक्य रहाणे 

युवा खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातने गतवर्षी दमदार प्रदर्शन करत तब्बल ७ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे यंदा त्यांचा प्रयत्न एक पाऊल पुढे जाऊन अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचा आणि ट्रॉफी जिंकण्याचा असेल. अशात अजिंक्य रहाणे या सिनियर खेळाडूचा अनुभव त्यांच्या खूप कामी येईल. त्यामुळे तो नक्कीच दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल.

या दमदार फलंदाजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २ शतके मारत ३८२० धावांची नोंद आपल्या खात्यात केली आहे.

४. श्रेयस अय्यर (कर्णधार) 

आयपीएल इतिहासातील सर्वात युवा कर्णधार श्रेयस अय्यर हा पहिल्याच नव्हे तर आय़पीएलच्या सर्व सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. गतवर्षी अय्यरच्या शानदार नेतृत्त्वामुळे संघाने ७ वर्षांनंतर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. गतवर्षीचे त्याचे फलंदाजी प्रदर्शनही दमदार राहिले होते. त्याने पूर्ण हंगामात १६ सामने खेळत एकूण ४६३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश होता.

५. रिषभ पंत 

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यामध्ये यष्टीरक्षणाची आणि मधल्या फळीत फलंदाजी करण्याची जबाबदारी अय्यर रिषभ पंतवर सोपवू शकतो. कारण रिषभ पंत हा भारतीय संघातील दमदार यष्टीरक्षक फलंदाज आहे. असे असले तरी, संघाकडे ऑस्ट्रेलियाचा ऍलेक्स कॅरी हा यष्टीरक्षणासाठी अजून एक पर्यायदेखील उपलब्ध आहे. पण, तरीही पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल.

गतवर्षीचे दिल्ली कॅपिटल्सकडून त्यानी केलेली विस्फोटक फलंदाजी पाहता यंदाही त्याच्याकडून संघाला अनेक अपेक्षा असणार आहेत.

६. शिमरॉन हेटमायर

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२०च्या लिलावात शिमरॉन हेटमायरला ७ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. तसेच, तो रिषभ पंतसोबत संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीची धुरा सांभाळण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाऊ शकते. २०१९साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून हेटमायरने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पूर्ण हंगामात ५ सामने खेळत एका अर्धशतकासह ९० धावा केल्या होत्या.

७. मार्कस स्टोइनिस 

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टोइनिस याची आयपीएल २०२०च्या खेळाडू लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ कोटी ८० लाखांची बोली लावली होती. एवढ्या महागड्या रक्कमेला त्यांनी मार्कसला आपल्या संघात विकत घेतले होते. त्यामुळे तो नक्कीच संघाच्या अंतिम ११ खेळाडूंपैकी एक असणार. या धुरंदर खेळाडूने आतापर्यंत २९ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४७३ धावा आणि १५ विकेट्सची नोंद आपल्या खात्यात केली आहे.

८. अक्षर पटेल 

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो. तो संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी या विभागात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. सोबतच तो फिरकीपटू असल्यामुळे संघाला त्याचा दुप्पट फायदा होणार आहे. कारण, युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर आहेत. शिवाय, गतवर्षी त्याला दिल्लीकडून १४ सामन्यात खेळण्याची मिळाली होती. तेव्हा त्याने ११० धावा आणि १० विकेट्स चटकावत स्वतला एक दमदार खेळाडू असल्याचे सिद्ध केले होते.

९. संदीप लामिछाने  

आयपीएल २०२०च्या आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछानेला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे युएईतील मैदाने. त्यामुळे संघाचा कर्णधार श्रेयस कमीत कमी ३ फिरकी गोलंदाजांना सामन्यात उतरवेल. त्यामध्ये संदीपचा समावेश असू शकतो. गतवर्षी त्याने दिल्लीकडून ६ सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या होत्या.

१०. इशांत शर्मा 

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा नक्कीच दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग ११चा भाग असेल. गतवर्षी आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला संघाबाहेर ठेवले होते. पण, त्यानंतर एका सामन्यात त्याला संधी देण्यात आली आणि तो तिथून पुढील हंगामातील सर्व सामन्यात संघाचा भाग राहिला. त्याने २०१९सालच्या पूर्ण आयपीएल हंगामात १३ सामन्यात खेळत १३ विकेट्स घेतल्या होत्या. यंदा तो नक्कीच यापेक्षा दमदार प्रदर्शन करताना दिसेल.

११. कागिसो रबाडा 

आयपीएल २०१९मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर विराजमान होता. त्याने १२ सामन्यात गोलंदाजी करत २५ विकेट्स चटकावण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे त्याच्या या आकडेवारीला पाहता, यंदाही त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून हंगामातील सर्व सामने खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---