fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ

September 4, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Screengrab: Twitter/ CPL

Screengrab: Twitter/ CPL


मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग 2020 मध्ये (सीपीएल) भारतीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे देखील खेळत आहे.  48 वर्षीय प्रवीण या टी -20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांने बीसीसीआय अंतर्गत असलेल्या सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली.

तांबे सध्या ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे, ज्यांनी या स्पर्धेत सलग आठवा विजय नोंदविला आहे. बुधवारी (2 सप्टेंबर) सेंट किट्स अँड नेव्हिस पैट्रियट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तांबेने एक झेल घेतला जो व्हायरल झाला. या कॅचचा व्हिडिओ सीपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केला गेला आहे.

वयाच्या 48 व्या वर्षी तांबेने ‘फ्लाइंग कॅच’ पकडला. तो झेल अविश्वसनीय होता.  या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने 59 धावांनी मोठा विजय मिळविला. खैरी पियरेच्या चेंडूंवर तांबेने एविन लुइसच झेल पकडला. तो झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.  तांबे याने हा झेल घेत हे सिद्ध केले की वय फक्त एक संख्या आहे आणि आपल्या चपळाईशी त्याचा काही संबंध नाही.

प्रवीण तांबे याच्या या झेलाची सोशल मीडियावरही चर्चा आहे.  सीपीएलने झेलाला ‘गुगली मॅजिक मोमेंट ऑफ द गेम’ म्हटले.

48 and flying! Pravin Tambe takes a screamer to take the Googly Magic Moment of the game! What a catch! #CPL20 #CricketPlayedLouder #TKRvSKP pic.twitter.com/xsJC49T2Zi

— CPL T20 (@CPL) September 2, 2020

तांबेने एकूण 33 आयपीएल सामने खेळले असून यावेळी त्याने एकूण 28 विकेट्स घेतल्या आहेत. तांबेने 2016 पासून आयपीएलचा कोणताही सामना खेळलेला नाही.  2013 मध्ये, तो वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल सामन्यात खेळला. यंदाच्या आयपीएलसाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांच्या लिलावात विकत घेतले होते.

परंतू त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) परवानगी न घेता दुबई आणि शारजाहमधील टी 10 लीगमध्ये भाग घेतला, यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यास त्याच्यावर बंदी घातली गेली.  बीसीसीआयच्या धोरणानुसार कोणताही बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेटपटू निवृत्तीची अधिकृत घोषणा न करता परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

ट्रेंडिंग लेख –

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू


Previous Post

दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

Next Post

फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलचा होणाऱ्या पत्नीसोबतचा व्हिडिओ पाहिला का? होतोय चांगलाच व्हायरल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

…म्हणून रिषभ पंतचे वडील आपल्या मुलाच्या छातीवर बांधायचे उशी

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“कृपया माझी तुलना धोनीसोबत करू नका”, रिषभ पंतने केली विनंती

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा

January 21, 2021
Photo Courtesy: MH File Photo
क्रिकेट

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Next Post
Screengrab: Instagram/ YuzvendraChahal

फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलचा होणाऱ्या पत्नीसोबतचा व्हिडिओ पाहिला का? होतोय चांगलाच व्हायरल

Photo Courtesy: Twitter/ IPL

आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा

Photo Courtesy: Twitter/ ICC

फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने आपल्या मैत्रिणीसाठी तोडला होता 'हा' मोठा नियम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.