---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या कृत्यामुळे वसीम अक्रमची आगपाखड

On: गुरूवार, सप्टेंबर 3, 2020 9:45 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळली गेलेली टी२० मालिका अखेर बरोबरीत राहिली, जरी पाकिस्तानसाठी मालिका फारशी संस्मरणीय नव्हती परंतु पाकिस्तानच्या संघाने मालिकेचा शेवटचा सामना जिंकून मालिका गमावण्यापासून स्वत: ला वाचवले. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसर्‍या सामन्यात १९५ धावा करूनही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

त्याचबरोबर दुसर्‍या टी२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांच्या खराब कामगिरीचा विचार करता मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता मिस्बाह उल हकच्या देहबोलीवरून त्याला अनेक खेळाडूंनी फटकारले.

मिस्बाह उल हक बसला होता डोक्यावर हात ठेवून

विशेष म्हणजे इंग्लंडच्या संघाने दुसर्‍या टी२० सामन्यादरम्यान ६५ धावांच्या मोबदल्यात एकही गडी गमावला नव्हता. पाकिस्तानचे गोलंदाज त्यांच्यासमोर हतबल झालेले दिसत होते. त्याच दरम्यान मिस्बाह उल हक एक हात डोक्यावर आणि एक हात चेहऱ्यावर ठेऊन बसला होता. हे चित्र टीव्हीवर दाखविण्यात आले. हा तो क्षण होता ज्यावेळी बराच खेळ बाकी होता. परंतु त्याची निराशा स्पष्टपणे दिसत होती.

मिस्बाहला हे करताना पाहून पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रम संतप्त झाला, त्याने मिस्बाहला फटकारले आणि सल्ला दिला. याबद्दल बोलतांना तो म्हणाला की, काहीही होऊद्या, कोणत्याही प्रशिक्षकाला सकारात्मक राहणे आवश्यक आहे.

अशी देहबोली कोणत्याही व्यक्तीसाठी चांगली नसते

वसीम अक्रमने मिस्बाहला फटकारताना म्हटले की, “डोक्यावर हात ठेवून बसणे हे कोणत्याही प्रशिक्षकाकडून आपल्या संघासाठी चांगले संकेत नाही. आम्हाला माहिती आहे की संघ आणि गोलंदाजांकडून चांगली कामगिरी केली जात नाही. परंतु कोणत्याही प्रशिक्षकासाठी देहबोली ही सर्वात महत्वाची आहे. परिस्थिती महत्वाची नसते . प्रशिक्षकाची जबाबदारी ही नेहमी सकारात्मक असणे गरजेचे आहे. किमान सकारात्मक तरी राहा.”

अख्तर-अक्रम यांनीही मिस्बाहच्या देहबोलीवर हल्ला चढविला

हे लक्षात घेण्यासारखे आहे की वसीम अक्रमशिवाय इंझमाम-उल-हक आणि शोएब अख्तर यांनीही मिस्बाह उल हकच्या देहबोलीवर प्रश्न उपस्थित केले.

इंझमामने सांगितले की, विरोधी संघाला अद्याप १५५-१६० धावा करायच्या आहेत, अशा परिस्थितीत सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो. परंतु आपण काहीतरी चुकीचे केले आहे असा संदेश आपण देत आहात. त्याच वेळी संघाच्या पराभवानंतर शोएब अख्तरने व्यवस्थापनावर आणि कर्णधार बाबर आझमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सीपीएलमध्ये जेसन होल्डरच्या संघाची नवीन उल हक पुढे सपशेल शरणागती

-मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत

-आता रैना म्हणतो; सीएसकेत परत येणार, पण फक्त या व्यक्तीसाठी

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---