चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. अशात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजीला येत सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर असा कारनामा केला आहे, जो आजवर आयपीएलच्या इतिहासात कधीही झाला नाही. First Batsman In IPL History Who Hit Four On First Ball Of First IPL Match
झाले असे की, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजीसाठी उतरले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर सामन्यातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. अशात रोहितने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर दमदार चौकार मारला.
आयपीएलच्या इतिहासात आजवर कोणत्याच फलंदाजाने पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर चौकार मारला नाही. त्यामुळे असा कारनामा करणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरला आहे.
असे असले तरी, रोहितला पुढे जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. चेन्नईचा फिरकीपटू पियूष चावलाने त्याला ४.४ षटकात पव्हेलियनला रस्ता दाखवला. रोहितने चावलाच्या चेंडूला मिड ऑफच्या वरुन सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु सॅम करनने झेल पकडत रोहितला बाद केले.
रोहितची विकेट गेल्यानंतर डी कॉकदेखील ३३ धावांवर बाद झाला. तर पुढे सूर्याकुमार यादवही १७ धावांवर पव्हेलियनला परतला . त्यानंतर एका बाजूने डाव पुढे नेणाऱ्या सौरभ तिवारीचा (४२ धावा) झेल फाफ डू प्लेसिसने घेतला. सोबतच त्याने पुढे फलंदाजीस आलेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही (१४ धावा) झेलबाद केले. डू प्लेसिसने घेतलेले हे दोन्ही झेल उल्लेखनीय होते. पंड्याच्या विकेटनंतर क्रुणाल पंड्या आणि कायरन पोलार्डलाही जास्त चांगली कामगिरी करता आली नाही.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सोबतच दीपक चाहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर पीयुष चावला आणि सॅम करनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईच्या ‘या’ धुरंदरने बाउंड्रीवर एक नव्हे तर झेलले २ अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ
-भल्या भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाने केलाय नकोसा विक्रम, ठरलाय एकमेव गोलंदाज
-नाणेफेक जिंकून सीएसकेची फिल्डिंग; या अष्टपैलू खेळाडूला नाही मिळाली जागा
ट्रेंडिंग लेख-
-‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!
-८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ