भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात दिवस-रात्र सामना होईल. या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली पहिला सामना खेळून मायदेशी परतणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे उर्वरित सामन्यांमध्ये संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे सांभाळेल. अशात विराटच्या अनुपस्थित संघातील या पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
हे असतील ते पाच खेळाडू –
अजिंक्य रहाणे
नुकत्याच ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेची फलंदाजी विशेष कामगिरी करु शकली नाही. परंतु पहिल्या सराव सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने नाबाद ११७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
चेतेश्वर पुजारा
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज चेतश्वर पुजारा याला कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते. ऑस्ट्रलिया अ विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पुजारा संघर्ष करताना दिसला. त्याने या सामन्यात केवळ ५४ धावा केल्या. पण यावरुन त्याच्या क्षमतेचा अंदाज लावता येत नाही. पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७७ सामन्यात ५८४० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २ द्विशतके, १८ शतके आणि २५ अर्धशतके लगावली आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो स्वत:ला सिद्ध करु शकतो.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात सपशेल फ्लॉप ठरला. परंतु ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात बुमराहने कमालीचे प्रदर्शन केले. केवळ गोलंदाजीमध्ये नव्हे, तर फलंदाजीमध्येही बुमराहने तडाखेबंद खेळी केली. फलंदाजी करताना त्याने नाबाद ५५ धावा केल्या, तर गोलंदाजी करतानाही २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या बुमराहच्या कसोटी मालिकेतील प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
मयंक अगरवाल
मयंक अगरवालने दुसऱ्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. यापूर्वी त्याने एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात २ द्विशतके, ३ शतके आणि ४ अर्धशतके लगावली आहेत. त्यामुळे मयंककडून संघाला खूप अपेक्षा असणार आहेत.
आर अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याला केवळ पहिल्या सराव सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते. परंतु, त्यातही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो कसोटीत जबरदस्त पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अशाप्रकारे करा स्मिथला बाद’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला उपाय
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला ‘हा’ क्रमांक
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”