गौतम गंभीर भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. क्रिकेटमधील उत्कृष्ट कारकीर्दीनंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. गौतम गंभीरने अनेक वेळा आपल्या फलंदाजीद्वारे भारतीय संघासाठी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. गंभीरनेही अनेकदा बलाढ्य संघांच्या गोलंदाजांविरूद्ध सहज फलंदाजी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे.
कधीकधी मैदानावरील त्याच्या आक्रमकतेवर टिका झाली, पण आपल्या खेळाच्या जोरावर त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. मोठ्या स्पर्धांमध्ये त्याची बॅट अधिक चांगली बोलली. त्याने काही अशा उत्तम खेळी केल्या आहेत की त्याचे नाव सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाजांच्या यादीत आहे. या लेखात त्याच्या फलंदाजीतून आलेल्या तीन सर्वोत्तम खेळींबद्दल आपण जाणून घेऊ.
२००७ टी-२० विश्वचषक अंतिम सामना – ७५ धावा
गंभीरने पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेली डाव कोणी विसरणार नाही. भारतीय संघातील फलंदाजांच्या एका बाजूने विकेट्स जात असताना गौतम गंभीरने एक बाजू सांभाळत ७५ धावा केल्या. त्याची ही खेळी फार महत्त्वाची ठरली. कारण भारताने हा विश्वचषक अवघ्या ५ धावांनी जिंकला.
२००९ नेपियर कसोटी – १३७
न्यूझीलंड विरुद्धच्या नेपियर येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताला डावाने पराभूत होण्याचा धोका होता आणि संघ फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसरा डाव खेळत होता. या भारताच्या दुसऱ्या डावात गौतम गंभीर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर निर्भीडपणे उभा राहिला. त्यामुळे तो गोलंदाजांच्या अडचणीचे कारण ठरला. त्या डावात त्याने १३७ धावा केल्या आणि भारतानेही सामना वाचविला. ही त्याची खेळी आजही अनेकांच्या लक्षात असेल.
२०११ विश्वचषक अंतिम सामना – ९७ धावा
श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरची विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यातील गंभीरने केलेली ९७ धावांची खेळी सर्वात खास मानली जाऊ शकते. भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले असताना गौतम गंभीरने तिसऱ्या क्रमांकावर येत किल्ला लढवला आणि आपली जबाबदारी पार पडली. या शानदार आणि ऐतिहासिक खेळीत त्याने ९७ धावा केल्या. विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यासह त्याने महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या आणि संघाने विश्वचषक जिंकला. गंभीरसाठीही बहुधा हा सर्वात खास डाव असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीकडूनही झाल्या होत्या चूका, ‘या’ ५ निर्णायामुळे ठरला होता टीकेचा धनी