भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याचे नाव दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते. यानंतर त्याने आयपीएलच्या मैदानावरच पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. अंतिम निर्णय ठरला, तर रोहित 11 तारखेला संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होऊ शकतो.
आयपीएलमध्ये दुखापतीमुळे रोहित शर्मा 4 सामने खेळू शकला नव्हता. यामुळे भारतीय क्रिकेट निवड समितीने त्याचे नाव ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळून टाकले होते. यानंतर रोहित शर्माने अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शविली. रोहितने मुंबईच्या संघात पुनरागमन केले व त्यानंतर आता त्याचा पुनर्विचार निवड समिती करू शकते. ‘हैमस्ट्रिंग’च्या दुखण्यामुळे बाहेर करण्यात आलेला रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलिया दौरा
ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. 3 वनडे सामन्यांची मालिका भारताचा संघ सर्वप्रथम खेळणार आहे. रोहित शर्मा पूर्ण तंदुरुस्त होईपर्यंत त्याला या मालिकेसाठी कदाचित विश्रांती दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. रोहितला टी-20 मालिकेत खेळवून पुन्हा कसोटीसाठी तयारी करण्यास वेळ दिला जाणार आहे. 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून हे चारही कसोटी सामने दोन्ही संघासाठी महत्त्वाचे असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख-
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत