झिम्बाब्वेचा माजी कर्णधार एल्टन चिगुंबुरा पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तयारी करत आहे. चिगुंबुरा हा सध्या पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी येथे होणार्या तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेचा भाग आहे.
झिम्बाब्वेचा दिग्गज खेळाडू एल्टन चिगुंबुरा याने आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीची समाप्ती करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर तो निवृत्त होणार आहे.
चिगुंबुराने 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बुलावायो येथे वनडे सामन्यातून त्याने कारकीर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने वनडे क्रिकेटमध्ये 2 शतकांसह 4340 धावा केल्या आहेत. सोबतच अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत त्याने 101 बळीही त्याने घेतले आहेत. वनडे सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 117 इतकी आहे.
याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 14 सामन्यांत 569 धावांसह गोलंदाजी करताना 21 बळीही घेतले आहेत. सोबतच टी30 क्रिकेटमध्ये त्याने 55 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 873 धावा केल्या आहेत. सोबतच गोलंदाजी करताना त्याने 16 बळीही घेतले आहेत.
2010 मध्ये चिगुंबुराला राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. त्याने प्रॉस्पर उत्सेयाकडून कर्णधारपद स्वीकारले. 2011 च्या विश्वचषकातही त्याने संघाचे नेतृत्त्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख-
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत