क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक चकमका घडताना आपण पाहिल्या आहेत. काहीवेळा अशा घटना संघातील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. असेच काही इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये पहायला मिळाले. इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने खुलासा केला आहे की, त्याचे आणि माजी कर्णधार केविन पीटरसनचे अजिबात जमत नव्हते.
यावेळी स्वानने सांगितले की, पीटरसन मला आवडत नव्हता. परंतु जेव्हा संघाच्या विजय मिळवण्याचा प्रश्न उपस्थित व्हायचा, तेव्हा तो सर्वकाही विसरून जात होता.
इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज पीटरसन (Kevin Pietersen) हा या संघाचा वादग्रस्त चेहरा होता. कर्णधार म्हणून २००८मध्ये त्याने ३ कसोटी आणि १० वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. हा काळ त्याच्या कारकीर्दीतील कठीण काळ होता.
स्वानने (Graeme Swann) इंग्लंड संघाकडून ६० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३० च्या सरासरीे २५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने सांगितले की, त्यांच्यातील वादानंतरही त्याला असे वाटत होते की पीटरसन त्याच्या बरोबर संघात रहावा. कारण तो अप्रतिम फलंदाजी करत होता.
स्वान पुढे म्हणाला की, आमचा संघ हा असा संघ आहे, जो जगातील अव्वल संघ बनला आहे. तसेच जर एखादा संघ असेल तर, निश्चितच त्यामध्ये वेगवेगळे लोकही असतील. त्यामध्ये ९९ टक्के लोक हे फक्त संघाचा विचार करतात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३मध्ये ऍशेस मालिकेत इंग्लंडने ३-०ने विजय मिळविला होता. यावेळी स्वान म्हणाला की, “पीटरसनने यापूर्वी इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला.”
“आम्ही दोघेही एकसारखेच होतो. आम्ही दोघेही स्वत:च्या हिंमतीवर संघात खेळत होतो. मी आणि पीटरसन दोघेही बर्याच जणांपेक्षा व्यावसायिकदृष्ट्या चांगले होतो. कारण दोघेही अगदी प्रामाणिक होतो,” असे यावेळी स्वान म्हणाला.
“तसेच आम्ही उघडपणे एकमेकांना नापसंत (Dislike) करत होतो. परंतु आम्हा दोघांनाही एकमेकांना संघात ठेवायचे होते. पीटरसन संघात असावा अशी माझी इच्छा होती. कारण त्याने बऱ्याच धावा केल्या होत्या. त्यामुळे तो खूप चांगला खेळत होता. सांगायचं झालं तर तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता,” असेही स्वान पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-थेट झाडावर चढून आयसीसीचा मोठा पंच बोलतोय फोनवर
-क्रिकेट आणि आकड्यांवरील प्रेमाचा मिलाफ
-भारतात येऊन भारतालाच चारीमुंड्या चीत करायचं म्हणतोय हा खेळाडू