---Advertisement---

गृहमंत्री अमित शहांनी धोनीच्या निवृत्तीवर केलं ट्विट, म्हणाले हेलिकॉप्टर शॉट….

---Advertisement---

काही दिवसांपूर्वी मा. गृहमंत्री अमित शहा हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मात्र, आज जेव्हा भारतीयांचा सर्वात आवडता क्रिकेटपटू माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त झाला, तेव्हा अमित शहा यांनी यावेळी धोनीच्या सेवानिवृत्तीबाबत ट्विट करत एक पोस्ट केली.

मिस करणार धोनीचा हेलिकॉप्टर –
धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मी मिस करेन असे मा. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

भारतीय क्रिकेटला अजून मजबूत करण्यासाठी आपले योगदान कायम असेल-
 मा. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून लिहिले की, “महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या अनोख्या क्रिकेट शैलीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मला आशा आहे की येणाऱ्या पुढील काळात तो भारतीय क्रिकेट अजून मजबूत करण्यासाठी आपले योगदान देत राहील. त्याला त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा. ”

जागतिक क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट मिस करेल, माही!

बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर क्रिकेटपटू वेगवेगळ्या प्रकारे फटके खेळताना दिसतात, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हेलिकॉप्टर शॉट’ हा एक असा शॉट आहे, ज्याची ओळख माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीमुळे झाली.

धोनीला आपण सर्वानी बऱ्याच सामन्यात हेलिकॉप्टर शॉट खेळताना पाहिलं असेल. हा शॉट धोनीला सचिन तेंडुलकर यांनी खेळायला शिकवलं असे बरेच लोक मानतात, परंतु ते चेकीचे आहे.

धोनीचा जवळचा मित्र संतोष लाल हा हेलिकॉप्टर शॉट्स चांगले खेळायचा आणि त्यानेच धोनीला हेलिकॉप्टर शॉट्स खेळण्यास शिकवले होते. धोनीच्या ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातही ही गोष्ट दाखवली गेली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---