---Advertisement---

जर्सी नंबर ७ रिटायर करा, धोनीमुळे करियरची वाट लागलेला खेळाडूचं म्हणतोय हे

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 9:10 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने इंस्टाग्रामवरुन भावूक करणारा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. यानंतर क्रिकेटच नाही तर विविध क्षेत्रातून धोनीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी धोनीबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचाही समावेश आहे.

दिनेशने धोनीबरोबरचा एक फोटो ट्विट करताना म्हटले आहे की ‘हा फोटो मागच्या विश्वचषकाच्या उपांत्यसामन्यानंतरचा आहे. या प्रवासातील अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. मला आशा आहे की बीसीसीआय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ७ क्रमांकाची जर्सी निवृत्त करेल. तूला (धोनी) तूझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा. मला खात्री आहे त्यातही तूझ्याकडे आम्हाला देण्यासाठी अनेक सरप्राईज असतील.’

मागीलवर्षी झालेल्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामना धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात दिनेशही खेळला होता.

विशेष म्हणजे धोनी आणि दिनेश हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज आहेत. तसेच कार्तिकने धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. परंतू त्याला नंतर धोनी संघात आल्याने आणि धोनीने कामगिरीत सातत्य राखल्याने भारतीय संघाकडून कमी संधी मिळाल्या. कार्तिकने ५ सप्टेंबर २००४ ला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर धोनीने २३ डिसेंबर २००४ ला पदार्पण केले होते.

त्यामुळे अनेकदा दिनेशसह धोनीच्या समकालीन यष्टीरक्षकांवर अन्याय झाल्याचे बोलले जाते. परंतू दिनेशने नेहमीच धोनी आणि त्याच्या मैत्री असल्याचे दाखवून दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---