मुंबई । वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत स्टुअर्ट ब्रॉड अव्वल 3 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. वेस्ट इंडीज मालिकेपूर्वी, दहाव्या क्रमांकावर असलेल्या ब्रॉडने 7 स्थानांची झेप घेतली आणि तिसरे स्थान मिळविले. त्यामुळे जसप्रीत बुमराहला फटका बसून तो कसोटी क्रमवारीत एक स्थान खाली घसरला आहे आणि तो 8 व्या स्थानावर आला आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत 2 कसोटी सामने खेळले आणि सर्वाधिक 16 बळी त्याच्या नावावर केले. यासह त्याने शानदार अर्धशतकही केले. ब्रॉडला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तिसर्या कसोटी सामन्यात ब्रॉडनेदेखील आपल्या कारकिर्दीतील 500 कसोटी विकेट्स पूर्ण केले. हा पराक्रम करणारा ब्रॉड फक्त 7 वा गोलंदाज आहे. त्याच्या आधी अँडरसनने इंग्लंडसाठी हा पराक्रम केला आहे. स्टुअर्ट ब्रॉडने मँचेस्टर कसोटीत 10 गडी बाद केले. त्याने आपल्या कारकीर्दीत तिसर्यांदा हा पराक्रम केला आहे.
It just keeps getting better for @StuartBroad8!
After becoming the latest entrant in the highly exclusive 500 Test wicket club, he has jumped seven spots to go to No.3 in the @MRFWorldwide ICC Test Rankings for bowlers ???????????? pic.twitter.com/XgX4YRdZLh
— ICC (@ICC) July 29, 2020
वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या कसोटीत 34 वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात 45 चेंडूत 62 धावा फटकावल्या. त्यामुळे अष्टपैलू क्रमवारीत त्याला फायदा झाला. ब्रॉड अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचला आहे. अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर बेन स्टोक्स कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर कायम आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार पॅट कमिन्स हा पहिला क्रमांकाचा गोलंदाज आहे. नील वॅग्नर दुसर्या, तिसर्या क्रमांकावर स्टुअर्ट ब्रॉड आहे. चौथ्या क्रमांकावर टीम साऊथी आहे. तसेच जेसन होल्डर पाचव्या, कॅगिसो रबाडा सहाव्या, मिशेल स्टार्क सातव्या आणि बुमराह आठव्या स्थानी घसरले आहेत. ट्रेंट बोल्ट 9 व्या आणि हेजलवुड 10 व्या स्थानी आहे.
बेन स्टोक्सचे नुकसान
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत 270 हून अधिक धावा करणार्या बेन स्टोक्सलाही आयसीसीच्या फलंदाजी कसोटी क्रमवारीत धक्का बसला आहे. बेन स्टोक्स तिसर्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानावर घसरला आहे. स्टीव्ह स्मिथ प्रथम स्थानावर आणि विराट कोहली दुसर्या क्रमांकावर कायम आहेत. तर तिसर्या क्रमांकावर मार्नस लब्युशाने आला आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा 8 व्या स्थानावर आणि अजिंक्य रहाणे 10 व्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाली सामान जप्त करण्याची धमकी, पाक बोर्ड म्हणतंय…
जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…
आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२०: सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणारे अव्वल १० क्रिकेटपटू…






