---Advertisement---

जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’

On: बुधवार, जुलै 29, 2020 9:12 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनच्या गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटत असायचा. जॉनसनने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. या गोलंदाजाचा चेंडू जेवढा चालायचा, तेवढीच त्याची प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध शाब्दिक चकमकही चालायची. तो आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असे. असेच एकदा जॉनसन मोठ्या वादामध्ये अडकला होता. त्याने विराट कोहलीला भारतीय संघाच्या नेतृत्वपदावरुन काढून टाकण्याचे वक्तव्य केले होते.

ही गोष्ट २०१७ सालची आहे, जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे हा भारताचा कर्णधार होता. विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे रहाणेवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

महत्त्वाचे म्हणजे, रहाणेने विराटच्या गैरहजेरीत भारतीय संघाची कमान उत्तमरित्या सांभाळली होती. भारताने तो सामना जिंकला होता. भारतीय संघाच्या विजयानंतर जॉनसनने एक ट्विट केले होते, ज्यामुळे खूप हंगामा झाला होता.

जॉनसनने ट्विटमध्ये लिहिले होते की, अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला पाहिजे. ही खूप अवघड मालिका होती. तरीही भारतीय खेळाडूंनी मैदानावर टिकून परिस्थितीचा सामना केला. अशाप्रकारे जॉनसनने थेट विराट कोहलीला नेतृत्त्वपदावरुन हटवण्यात यावे, असे म्हटले होते.

२०१७साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळण्यात आलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराटला निशाण्यावर ठेवले होते. सामन्यादरम्यान अनेकदा ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि विराटमध्ये बाचाबाती झालेली पाहायला मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…

‘रोहित शर्मा पुढचा एमएस धोनी आहे’, पहा कोण म्हणतयं

एक चुकी वेस्ट इंडिजला भोवली, तर अन्य ५ खास कारनामेही या कसोटीत पहायला मिळाले

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम

आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर

एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---