---Advertisement---

झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…

On: बुधवार, जुलै 29, 2020 10:18 PM
---Advertisement---
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इतर खेळाडूंप्रमाणेच कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचबरोबर तो यादरम्यान सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. अशाचप्रकारे त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एका झाडावर बसलेला दिसत आहे.विराटने (Virat Kohli) हा फोटो शेअर करत लिहिले की, “जेव्हा तुम्ही झाडावर चढून मजा करता.” या कॅप्शनमध्ये त्याने हसणाऱ्या इमोजीचाही समावेश केला आहे. विराटच्या या फोटोवर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनेही (Irfan Pathan) कमेंट केली आहे. त्याचबरोबर विराटच्या या फोटोला तब्बल ९० हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

विराट लॉकडाऊनमध्ये चांगलाच सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्याने आधीही बरेच फोटो शेअर केले आहेत.

विराटने भारतीय संघाकडून ८६ कसोटी सामने, २४८ वनडे सामने आणि ८२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७२४० धावा, वनडेत ११८६७ आणि टी२०त २७९४ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके पूर्ण केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाली सामान जप्त करण्याची धमकी, पाक बोर्ड म्हणतंय…

जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’

पदार्पण करताच शुन्यावर झाला बाद, कॉमेडी नाटकातही केले काम, आता ११ वर्षांनंतर करतोय पुनरागमन

ट्रेंडिंग लेख –

वर्ल्डकपसाठी बोट कापायलाही तयार झालेला जेकब ओरम

देशांतर्गत क्रिकेटचा सर्वात मोठा ऑल-राऊंडर आज झाला निवृत्त

आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---