---Advertisement---

इम्रान ताहीर म्हणतो, हा तर जगातील सर्वात तरुण पण अतिशय कार्यक्षम कर्णधार

On: शनिवार, जुलै 25, 2020 4:15 PM
---Advertisement---

मुंबई । आयसीसीच्या टी 20 मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीतही बाबर आझम अव्वल आहे, तर वनडेत तो तिसरा आणि कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरने पाकिस्तानच्या बाबर आजमचे कौतुक करत त्याला जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे सांगितले.

आझमच्या नेतृत्त्व गुणांचे कौतूक करताना ताहीर म्हणाला, “आझम हा पाकिस्तानमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो अतिशय तरुण खेळांचा भरणा असलेल्या पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे.”

ताहिर म्हणाला,  “बाबर आझम यांच्या नेतृत्वात खेळणारा सध्याचा संघ खूपच तरुण आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की तो आज जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. युवा खेळाडूंनी बरीच मेहनत घेतली आहे. माझा अनुभव मला सांगतो की भविष्यात ते चांगले काम करील पण त्याचबरोबर ते काही सामने गमावल्यास हार मानायला तयार असले पाहिजे.”

आझम सध्या राष्ट्रीय संघासह इंग्लंड दौर्‍यावर आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तानला तीन कसोटी आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 5 ऑगस्टपासून मँचेस्टर येथे खेळला जाईल तर शेवटचे दोन कसोटी अनुक्रमे 13 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होणार आहेत. तसेच मॅन्चेस्टरमध्ये 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला एकाच मैदानावर टी 20 सामने खेळवले जातील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---