ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाला गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधार गौतम गंभीरनेही भारताच्या सलग दोन पराभवांना विराटच्या निराशाजनक नेतृत्त्वाला जबाबदार धरले आहे. विराटचे निर्णय माझ्या समजण्या पलीकडचे असतात, असे गंभीर म्हणाला.
बुमराहला पावरप्लेमध्ये द्यावी जास्त गोलंदाजी
रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या वनडे सामन्यात विराट कोहलीने आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्या दहा षटकांत फक्त दोन षटके टाकण्यास दिली होती. विराटच्या या निर्णयावर गंभीरने जोरदार टीका केली. तो म्हणाला, “प्रमुख वेगवान गोलंदाजाचे काम हे नव्या चेंडूने बळी मिळवून देण्याचे असते. मात्र, तुम्ही बुमराहसारख्या गोलंदाजाला नव्या चेंडूने फक्त दोन षटके टाकायला देत असाल, तर तुम्हाला बळी कसे मिळणार?”
पावरप्लेनंतर बुमराहला गोलंदाजी देऊन फायदा नाही
एका क्रीडा संकेतस्थळावरील चर्चेत बोलताना गंभीर पुढे म्हणाला, “तुम्ही बुमराहला पावरप्लेनंतर गोलंदाजीला आणल्यास काही फायदा होत नाही. तोपर्यंत फलंदाज स्थिर झालेले असतात. जुन्या चेंडूने तुम्ही बुमराहकडून कायमच सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करू शकत नाही. यावेळी ऑस्ट्रेलियातील वातावरण काहीसे उष्ण असते. बुमराह देखील माणूसच आहे. या गोष्टीचा विचार विराटने करायला हवा.”
बुमराहला पावरप्लेमध्ये गोलंदाजी न देण्याच्या निर्णयाला गंभीरने घोडचूक म्हटले. त्याने पुढे सांगितले, “जेव्हा तुमच्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून बुमराह खेळत असतो, तेव्हा तुम्ही त्याला पावरप्लेमध्ये अवघी दोन षटके गोलंदाजी देऊ शकत नाही. मी म्हणेल, ही फक्त चूक नाही, तर खूप मोठी चूक आहे. बुमराह व शमीने पहिल्या पावरप्लेमध्ये प्रत्येकी पाच षटके गोलंदाजी करायला हवी. तेव्हाच बळी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.”
गंभीरने भारताकडून २००३ ते २०१८ या काळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. धोनीच्या अनुपस्थित तो भारताचा कर्णधार आहे राहिला आहे. आयपीएलमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स संघाला दोन वेळा अजिंक्यपद मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला होता. सध्या तो दिल्लीमधून लोकसभा खासदार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत