fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘…तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा,’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे वक्तव्य

india should celebrate for year if they manage to beat australia in virat absence says michael clark

November 30, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/ChennaiSuperKings

Photo Courtesy: Twitter/ChennaiSuperKings


ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. या दौर्‍यावरील भारतीय संघाची सर्वात मोठी परीक्षा आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या रूपाने घेतली जाईल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने सुरुवात होईल. यावेळी भारतावर दबाव अधिक असेल. कारण नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतेल. अशा परिस्थितीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने मोठे वक्तव्य केले आहे.

तो म्हणाला की, कर्णधार विराट कोहलीविना भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर या विजयाचा आनंद वर्षभर साजरा करावा.

… तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा

क्लार्कने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील विजेत्याचा अंदाज लावताना सांगितले, “मी या प्रश्नावर म्हणेल, जर भारतीय संघ विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करू शकला, तर त्यांनी वर्षभर याचा आनंद साजरा करावा. भारतीय संघाने सकारात्मक रहावे. त्यांना आत्मविश्वास हवा की, आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करू शकतो.”

विराटच्या जागी कोण?

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार राहिलेल्या क्लार्कने इंडिया टुडेशी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकांविषयी विस्तृत चर्चा केली. क्लार्क म्हणाला, “सध्याच्या भारतीय संघात विराट दोन जबाबदाऱ्या सांभाळतो. तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. तसेच कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. त्याच्या जागी तशीच कामगिरी कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे.”

राहुल खेळू शकतो चौथ्या क्रमांकावर

क्लार्कने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नवा उपकर्णधार केएल राहुल यांची प्रशंसा केली. क्लार्क म्हणाला, “मला वाटते विराट भारतात आल्यानंतर, राहुलने त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. तो त्याच्याच शैलीचा फलंदाज आहे. तो यापूर्वी ऑस्ट्रेलियन परिस्थितीमध्ये खेळला आहे. त्याचा अनुभवही वाढलाय. तो नक्कीच उत्तम कामगिरी करेल. मात्र, विराटसारख्या खेळाडूची जागा घेणे सोपे नसते.”

अजिंक्य रहाणे उत्तम कर्णधार

क्लार्कने भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे देखील कौतुक केले. तो म्हणाला, “मला अजिंक्यची नेतृत्त्वशैली खूप आवडते. तो एक उत्तम कर्णधार आहे. त्याला क्रिकेटची चांगली समज असल्याने, तो चांगली रणनिती बनवू शकतो. विराट नसल्याने अजिंक्य व भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी चालून आलेली आहे.”

मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या २०१५ विश्वचषकावेळी तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. २०११-२०१२ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने ३२९ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा काढत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत


Previous Post

भारताला ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य भेदण्यासाठी ‘रोहित’ आवश्यक; माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

Next Post

‘विराट कोहली उतावळा कर्णधार’, भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाची टीका

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

'विराट कोहली उतावळा कर्णधार', भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाची टीका

Photo Courtesy: Twitter/ ICC

'तुझी खेळभावना कुठे गेली?', काँग्रेस नेत्याने भारतीय खेळाडूबद्दल प्रश्न केला उपस्थित

वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर 'या' स्टार कुस्तीपटूची माघार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.