भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्वतःला ‘नवीन भारताचा प्रतिनिधीत्व’ म्हणून घेतले जो पूर्ण आशेसोबत नवीन आव्हानाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असतो. कोहली ग्रेग चॅपेल यांच्या टिप्पणी संदर्भात बोलत होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेल म्हणाले होते की, ‘कोहली ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू व्यतिरिक्त सर्वाधिक ऑस्ट्रेलियन (मानसिकता असणारा खेळाडू)आहे.’
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीला त्याच्या आक्रमक क्रिकेट आणि जुगारूपणाबद्दल विचारले गेले. ज्याचा उल्लेख माजी भारतीय प्रशिक्षक राहिलेले ग्रेग चॅपेल यांनी केला होता. चॅपेल यांना अशा प्रकारची मानसिकता आपल्या देशातील क्रिकेटपटूमध्ये वाटते. कोहली म्हणाला, “मी नेहमी म्हणत आलो की, ही माझी स्वतःची शैली आहे. ज्याप्रकारे माझे व्यक्तिमत्व आणि चरित्र आहे, मी नवीन भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. मी याला अशा प्रकारे बघतो.”
विराट म्हणाला, ” माझ्या डोक्यात ऑस्ट्रेलियन मानसिकता किंवा अशा प्रकारची तुलनेची गोष्ट नाही. हे भारतीय संघाला पुढे घेवून जाताना जोडले आहे आणि पहिल्या दिवसापासून माझे व्यक्तिमत्व असेच राहिले आहे.” तो पुढे म्हणाला, “नवीन भारताचा म्हणजे जो कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करताना घाबरत नाही.”
विराट म्हणाला, “नवीन भारत आव्हानाचा सामना करतो आणि त्याच्यामधे आशा आणि सकारात्मकता भरतो. आम्ही हे सुनिश्चित करतो की आम्ही आमच्या समोर येणार्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे.
१७ डिसेंबरपासून कसोटी मालिका
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर आत्तापर्यंत वनडे आणि टी-२० मालिका खेळल्या गेल्या. ज्यातील वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारताने बाजी मारली. यानंतर आता १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना अॅडलेडच्या मैदानावर प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळला जाईल.
संबधित बातम्या:
– रहाणेच्या नेतृत्वाबद्दल कोहलीने केले भाष्य; म्हणाला
– म्हणून केएल राहुलला पहिल्या कसोटीतून वगळले; विराट कोहलीने सांगितले कारण
– कोहली नव्या भारतीय संघाचा प्रतीक, कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने