आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्येही शुक्रवारी (4 डिसेंबर) पदार्पण केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी नाणेफेकी दरम्यान लागोपाठ दोन वनडे सामन्यात आणि टी-20 सामन्यात नटराजनला खेळवण्या मागील कारण सांगितले आहे.
विराट कोहली म्हणाला, “टी नटराजन आज टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. तो तिसर्या वनडे दरम्यान खूप प्रभावी आणि सूर गवसलेला दिसून येत होता. हेच कारण आहे की आज त्याला टी-20 संघात सहभागी करण्यात आले.
ही एक चांगली संधी आहे. जेव्हा आपण काही मुलांकडे बघितले, तर आम्ही आमच्या गोलंदाजीचा ताण खूप चांगल्या प्रकारे हाताळला आहे.”
आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टी नटराजन शिवाय दीपक चाहर आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांवर गोलंदाजीची मदार असणार आहे. आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली. मोहम्मद शमीला मागील तिसर्या वनडेत विश्रांती दिली होती अणि जसप्रीत बुमराहला खेळवण्यात आले होते.
वनडे पदार्पणात घेतले दोन बळी
टी नटराजनने तिसर्या वनडे सामन्यात पदार्पण करताना दोन बळी टिपले होते. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्यूशाने आणि ऍश्टन एगर यांना नटराजनने तंबूत पाठवले होते.
आयपीएलमध्ये 2017 साली केले होते पदार्पण
आयपीएल 2017 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये नटराजनने पदार्पण केले होते. खूप कमी कालावधीमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरचा तो विश्वासू वेगवान गोलंदाज बनला होता. नटराजन हा याॅर्कर गोलंदाजी बरोबर शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यात माहीर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा
ट्रेंडिंग लेख-
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर