---Advertisement---

अनोख्या पद्धतीने साजरा केला सैनीचा वाढदिवस, खेळाडू दिसले मास्कमध्ये

On: सोमवार, नोव्हेंबर 23, 2020 11:00 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आज आपला २८ वा वाढदिवस साजरा करतोय. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ सिडनीमध्ये आहे. सैनीने आपला वाढदिवस आपल्या संघ सहकार्‍यांसोबत हॉटेलमध्ये साजरा केला. मात्र, दरवेळीपेक्षा यावेळी त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन काहीसे निराळे होते.

कप केक कापून साजरा केला वाढदिवस

भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूचा वाढदिवस हा सर्व खेळाडू एकत्रितपणे साजरा करत असतात. प्रत्येक वाढदिवसावेळी सर्व खेळाडू वाढदिवस असणार्‍या खेळाडूंच्या चेहऱ्याला केक लावून सेलिब्रेशन करतात. मात्र, सैनीचा वाढदिवस त्या पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला नाही. इतरवेळी वापरण्यात येणाऱ्या केकऐवजी आज कप केक कापण्यात आले.

क्वारंटाइन नियमांनुसार साजरा केला गेला वाढदिवस

सैनीच्या वाढदिवसानिमित्त कप केक कापण्यामागे नवीन क्वारंटाईन नियमांचे कारण होते. कोविड-१९ महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईन नियम खूपच कडक करण्यात आले आहेत. त्या नियमांनुसार, एकत्रितरित्या जमा होऊन केक कापण्यास बंदी आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये संघ सहकाऱ्यांना घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्या सर्वांना मास्क घालणे बंधनकारक केले गेले होते.

सिडनीमध्ये होईल ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दौऱ्याची सुरुवात सिडनी वनडेने होईल. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर, तीन सामन्यांची टी२० मालिका व अखेरीस चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. सैनी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा यांच्यासोबत भारतीय वेगवान माऱ्याला बळकटी देईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘संघ सहकाऱ्यांनी धीर दिला’, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सिराज झाला भावुक

वनडे मालिकेआधी वाढली विराटची डोकेदुखी, सलामीचा प्रश्न कसा सोडवणार?

‘त्याला बाद झाल्याने फरक पडत नाही’, माजी दिग्गजाचे पृथ्वी शॉवर टिकास्त्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---