चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होला वाटतं की एमएस धोनीने ज्या प्रकारे भारतीय संघातील बदल हाताळले, त्याच प्रकारे या संघातीलही बदल तो हाताळेल.
धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेतला. त्याला भारताच्या महान कर्णधारांमध्ये गणले जाते. ब्राव्होला (Dwayne Bravo) वाटते की धोनीवर (MS Dhoni) भारतीय संघाचे नेतृत्व करताना जेवढा दबाव होता, तेवढा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना नसेल.
जेव्हा माध्यमांनी ब्राव्होला धोनीच्या वारसदाराबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “मला माहित आहे की काही काळापासून हे त्याच्या मनात चालू असेल? माझं म्हणणं आहे की एक वेळी आम्हा सर्वांनाच वेगळं व्हावं लागेल. हे सर्व या गोष्टीवर निर्भर आहे की तुम्ही कधी माघार घेताय आणि हे कोणाला सांभाळायला देताय. मग सुरेश रैना (Suresh Raina) असो किंवा एखादा युवा खेळाडू.”
“आता त्यांना कोट्यावधी लोकांची चिंता करण्याची गरज नाही. ही केवळ फ्रँचायझीची बाब आहे, परंतु मला असे वाटत नाही की यामुळे एक माणूस म्हणून त्याच्यात बदल घडवून आणतील. निश्चितच तो जसा होता तसाच राहील,” असेही तो पुढे म्हणाला.
ब्राव्हो आपल्या संघाबद्दल बोलताना म्हणाला, “आमचा संघ खूप प्रतिभाशाली आहे. ज्यामध्ये अनुभवही आहे. तसेच, आमच्याकडे सक्षम व्यवस्थापन स्टाफ आहे. जो शांत आणि संतुलित आहे. यामध्ये आमच्या मालकाचाही समावेश आहे. या सर्वांनी मिळून संघाला यशस्वी फ्रँचाइजी बनविले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा
-कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्…
-टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचे सितारे : पंजाबला विजेतेपद मिळवून देण्यास आतुर असलेला ‘गॅंग्स ऑफ कर्नाटक’ जगदीशा सुचिथ
-भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
-टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ