fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किंग्ज इलेव्हन पंजाबने एकदा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता…?

ipl kxip uae 2020 all time records kl rahul kings xi punjab team records stats

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


यंदा पंजाब संघाला पहिल्या विजेतेपदाची आशा, मागील १२ हंगामात २ वेळा गाठली होती उपांत्य फेरी
किंग्ज इलेव्हन पंजाबने एखादा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता…?

 

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३ वा सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब हा गेल्या १२ हंगामापासून पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा करीत आहे. संघाने २००८ आणि २०१४ मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब संघ २०१४ मध्ये उपविजेता संघ ठरला होता. गेल्या १२ हंगामात दोनदा उपांत्य फेरी गाठणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१४ मध्ये एकमेव अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर पंजाब संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही.

पंजाबकडून खेळताना सध्याचा कर्णधार केएल राहुलने दोन मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थान मिळवले होते. २०१९ मध्ये डेव्हिड वॉर्नर याने १२ सामन्यात ६९२ धावा करून प्रथम क्रमांक मिळवला तर राहुलने १४ सामन्यात ५९३ धावा करून दुसरा क्रमांक मिळवला होता.

गेल्या दोन मोसमात संघाचा सर्वाधिक धावा करणारा केएल राहुल या १३ व्या हंगामात संघाचे नेतृत्व करीत आहे. आता या युवा कर्णधाराकडून जेतेपद मिळविण्याची आशा आहे.

या हंगामात पंजाबने दिल्लीशी केले दोन हात

यावेळी कोरोनामुळे आयपीएल २०२० स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरु झाली. अंतिम सामना १० नोव्हेंबरला होईल. पंजाब संघचा आपला पहिला सामना २० सप्टेंबर रोजी दिल्ली संघाविरुद्ध झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीची लढत दिली. सुपर ओव्हर पर्यंत पोचलेल्या या सामन्यात शेवटी दिल्ली संघाने बाजी मारली. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २५ सामने खेळले गेले आहेत. पंजाबचे १४ सामने असून दिल्लीने ११ सामने जिंकले आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा आयपीएलमधील आलेख

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आतापर्यंत एखादाही आयपीएल चषक जिंकला नाही, परंतु या संघाने २०१४ मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या संघाकडून शॉन मार्श सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, त्याने २००८ ते २०१७ दरम्यान ७१ सामन्यात २४७७ धावा केल्या. तर लक्ष्मीपती बालाजीने ७३ सामन्यात ७६ बळी घेतले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबची आत्तापर्यंतची कामगिरी – 

२०१९ – नंबर ६
सर्वाधिक केएल राहुल ५९३ धावा आणि सर्वाधिक मोहम्मद शमी १९ बळी
२०१८ – नंबर ७
सर्वाधिक केएल राहुल ६५९ धावा आणि सर्वाधिक अँड्रयू टाई २४ बळी
२०१७ – नंबर ५
सर्वाधिक हाशिम आमाला ४२० धावा आणि सर्वाधिक संदीप शर्मा १७ बळी
२०१६ – नंबर ८
सर्वाधिक मुरली विजय ४५३ धावा आणि सर्वाधिक संदीप शरण १५ बळी
२०१५ – नंबर ८
सर्वाधिक डेव्हिड मिलर ३५७ धावा आणि सर्वाधिक अनुरीत सिंग १५ बळी
२०१४ – उपविजेता
सर्वाधिक ग्लेन मॅक्सवेल ५५२ धावा आणि सर्वाधिक संदीप शर्मा १८ बळी
२०१३ – नंबर ६
सर्वाधिक डेव्हिड वॉर्नर ४१८धावा आणि सर्वाधिक अजहर महमूद १५ बळी
२०१२ – नंबर ६
सर्वाधिक मनीष सिंग ४३२ धावा आणि सर्वाधिक परविंदर आवाना १७ बळी
२०११ – नंबर ५
सर्वाधिक शॉन मार्श ५०४ धावा आणि सर्वाधिक रेहान हैरीस १६ बळी
२०१० – नंबर ८
सर्वाधिक महेला जयवर्धने ४३९ धावा आणि सर्वाधिक इरफान पठाण १५ बळी
२००९ – नंबर ५
सर्वाधिक युवराज सिंग ३४० धावा आणि सर्वाधिक इरफान पठाण १७ बळी
२००८ – सेमीफायनल
सर्वाधिक शॉन मार्श ६१६ धावा आणि सर्वाधिक एस श्रीशांत १९ बळी

आयपीएल २०२० किंग्ज इलेव्हन पंजाब संघ: केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, जिमी नीशम, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, तजिंदर सिंग, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णाप्पा गौतम, हार्दस विल्जॉइन आणि सिमरन सिंह.


Previous Post

धोनी, रोहित आणि गंभीरनंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट बनला चौथा कर्णधार

Next Post

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Photo Courtesy: Twitter/Sunrisers

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची 'ही' आहेत ५ कारणे, घ्या जाणून...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.