---Advertisement---

सुरेश रैनाने माझ्यासाठी जे- जे केलं तसं दुसरं कुणी कुणासाठी करु शकत नाही

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 6:36 PM
---Advertisement---

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू आयपीएल २०२०च्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. यामध्ये१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा स्टार मध्यमगती वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचाही समावेश आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्यागी खूप उत्साहित आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक समर्थन लाभलेल्या खेळाडूविषयी त्यागीने पीटीआयला माहिती दिली आहे. Kartik Tyagi Talks About Suresh Raina, Pravin Kumar And Jofra Archer

केवळ १७ वर्षांचा असताना उत्तर प्रदेश संघात सामील होण्यापासून ते आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत आपल्या मिळालेल्या पाठींब्याचे पूर्ण श्रेय त्यागीने भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाला दिले आहे. रैनादेखील देशांतर्गत क्रिकेटमधील उत्तर प्रदेश संघाच्या दमदार फलंदाजांपैकी एक आहे.

पीटीआयशी बोलताना त्यागी म्हणाला की, “रैना भैय्याचे जे योगदान राहिले आहे, ते मी कधीच विसरू शकत नाही. मला रणजी ट्रॉफी शिबिरात सामाविष्ट होण्यासाठी थेट १६ वर्षांखालील संघातून बोलवण्यात आले होते. त्यावेळी रैना भैय्याने मला पाहिले होते. त्यानेच काही दिवसांसाठी निवडकर्त्यांना मला रणजी संघात ठेवण्यासाठी सांगितले होते.”

“मला हादेखील उल्लेख करायचा आहे की, कशाप्रकारे पीके भैयानेही मला समर्थन केले होते. रेल्वेविरुद्धच्या एक सामन्यादरम्यान रैना भैया मिड ऑफवर उभा होता आणि पीके भैया मिड ऑनवर उभा राहून मला मार्गदर्शन करत होता. तो काळजी घेत होता की, मी सामन्यादरम्यान नर्वस होऊ नये,” असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रविण कुमार (पीके)विषयी बोलताना त्यागीने सांगितले.

याव्यतिरिक्त त्यागीने राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविषयी बोलताना म्हटले की, “आर्चर हा जगातील सर्वश्रेष्ट वेगवान गोलंदाज आहे. पण, मला त्याच्याकडून त्याची वेगाने चेंडू टाकण्याची शैली शिकायची नाही. त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण, मला त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या सर्व बाबींविषयी असणाऱ्या विचारांबाबत जाणून घ्यायचे आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---