---Advertisement---

हिंदी येत असूनही इंग्लंडच्या खेळाडूने भासवले येत नसल्यासारखे; ऐकली धोनीची रणनीती, तरीही…

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2020 7:46 PM
---Advertisement---

नवी दिल्‍ली। १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यष्टीच्या मागे उभा असतो. परंतु त्याचे लक्ष बाऊंड्रीवरील क्षेत्ररक्षकापासून ते गोलंदाजाच्या पायांपर्यंत असते. नेहमी तो यष्टीमागून गोलंदाजाला सांगत असायचा की, त्याला कशाप्रकारे चेंडू टाकायला हवा, फलंदाज कशाप्रकारे खेळणार आहे. गोलंदाजदेखील धोनीच्या सांगण्याप्रमाणे गोलंदाजी करत आणि यशस्वीरीत्या विकेट्सही मिळवायचे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धोनी नेहमी संघसहकाऱ्यांशी हिंदीमध्ये चर्चा करायचा. जेणेकरून विरोधी संघाला त्याची भाषा समजू नये. परंतु इंग्लंडचा गोलंदाज माँटी पानेसरला धोनीने हिंदीमध्ये गोलंदाजांना सांगितलेली योजना समजली होती. तरीही त्याने धोनीसमोर आपल्याला काहीच न समजल्याचे नाटक केले होते. पानेसरने भारताविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्या मालिकेत धोनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. इंग्लंडच्या संघाला धोनीची रणनीती माहीत नव्हती. परंतु पानेसरला धोनीचा हिंदीतील प्रत्येक शब्द समजत होता.

कोणत्याही गोष्टीला प्रत्युत्तर देत नव्हता धोनी

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पानेसर म्हणाला की, “धोनी अधिक बोलत नसायचा. तो गोष्टी समजून घेण्याबाबत हुशार आहे. तुम्ही त्याला काहीही म्हणा, तो कधीच प्रत्युत्तर नाही देणार. परंतु जेव्हा तो फलंदाजीसाठी येईल किंवा तुमच्यासाठी क्षेत्ररक्षण लावेल, तेव्हा तुम्ही तयार राहा.”

“मला आठवते की, जेव्हा तो आपल्या गोलंदाजांना विशेषत: यष्टीमागून फिरकीपटूंना काही टिप्स देत होता, त्यावेळी धोनी म्हणत होता की, आता थोडे वाईड चेंडू टाका. आता थोडे सरळ यष्टीच्या दिशेने टाका. हा क्रॉस लिंक फटका खेळणार आहे, सरळ चेंडू टाका. हा डीप मिड- विकेटवर षटकार मारेल, थोडा वाईट चेंडू टाका,” असेही तो पुढे म्हणाला.

हिंदी आणि पंजाबी चांगल्या प्रकारे समजते

पानेसर म्हणाला की, त्याला धोनीद्वारे सांगण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी समजत होत्या. त्याने पुढे म्हटले की, “मी हिंदी आणि पंजाबी भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकतो. धोनीला वाटले की, मला समजले नाही. मी सर्व काही ऐकले. परंतु मी असे दाखवून दिले की मी जसे काहीच ऐकले नाही. मला सर्वकाही माहीत होते.”

पानेसरचे वडील १९७९ साली पंजाबमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते. पानेसर म्हणाला की, “धोनीच्या या रणनीतीमुळे संघाला विकेट्सही मिळाले होते. मला अभिमान आहे की मी धोनीविरुद्ध खेळलो.”

महत्त्वाच्या बातम्या-

-मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

-सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

-बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर

ट्रेंडिंग लेख-

-लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश

-मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप

-‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---