fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप

2 Players Who Played Only 1 Match From Mumbai Indians

August 28, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोन्हींमध्ये अफलातून प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची प्रशंसा तर होते. पण, जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक लोकप्रिय असेलल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली तर त्या खेळाडूची प्रशंसा देखील कमी होत नाही. त्यातही ते खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचे असतील, तर त्यांचा गोष्टच निराळी असते. हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू त्यांच्या आयपीएलमधील प्रदर्शनामुळेच पहिल्यांदा चर्चेत आले होते.

अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सर्वात यशस्वी संघाकडून खेळण्याचे कित्येक खेळाडूंचे स्वप्न असते. पण या दमदार संघात कोणत्याही खेळाडूला स्थान मिळणे, सोपी गोष्ट नाही. एखाद्या खेळाडूची संघात निवड जरी झाली, तरी त्याला पूर्ण हंगामात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, मुंबई इंडियन्स संघात आधीपासूनच बरेच दमदार खेळाडू उपस्थित आहेत.

या लेखात, मुंबई इंडियन्स संघातील अशा खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे, ज्यांना संघाकडून फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली (2 Players Who Played Only 1 Match From Mumbai Indians) –

२. रसिक सलाम

जम्मू-काश्मिरचा युवा वेगवान गोलंदाज रसिक सलाम याला आयपीएल २०१९च्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपल्या संघात विकत घेतले होते.

भारतीय दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठानच्या मार्गदर्शनाखाली दमदार गोलंदाज बनलेल्या सलामकडून जम्मू-काश्मिरसहित सर्व क्रिकेट चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या. पण, सलामला मुंबई इंडियन्सकडून पूर्ण हंगामात केवळ एकच सामना खेळायला मिळाला. २४ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ४ षटकात ४२ धावा देत एकही विकेट घेतली नाही. तर त्याने फलंदाजी करताना केवळ ५ धावा केल्या होत्या.

सलामच्या या प्रदर्शनाला पाहता त्याला आयपीएल २०२०च्या लिलावात संघातून बाहेर करण्यात आले.

१. युजवेंद्र चहल 

भारतीय संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल २०११ पासून ते २०१३ पर्यंत आयपीलच्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण, त्याला या तिन्ही हंगामात मुंबईकडून केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. २४ एप्रिल २०१३रोजी त्याने मुंबईकडून एकमेव सामना खेळला. तो त्याचा पदार्पणाचा आणि त्या पूर्ण हंगामातील एकमेव सामना ठरला. त्या सामन्यात चहलने ४ षटके गोलंदाजी करत ३४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

पुढे २०१४सालच्या आयपीएल लिलावात चहलची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवड झाली. तेव्हापासून तो आरसीबी संघाचाच भाग आहे. आयपीएल कारकिर्दीतील ८३ सामने त्याने आरसीबीकडूनच खेळले आहेत.

ट्रेंडिंग लेख –

‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?

वाढदिवस विशेष: धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा

एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी

महत्त्वाच्या बातम्या –

पाणीपुरी विकून जीवन जगणाऱ्या पठ्ठ्याचे आता बदलणार आयुष्य; गुरुमंत्र घेऊन ठेवतोय आयपीएलमध्ये पाऊल

विराट कोहली बाप होणार असल्याची बातमी कळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची उडाली झोप

नवरा क्रिकेटच्या मैदानात तर बायको तमिळ चित्रपट सृष्टीत करतेय धमाका


Previous Post

लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश

Next Post

सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे 'विराट' विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.