आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने चांगली कामगिरी न केल्यामुळे कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवाला बलात्काराची धमकी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे धोनीच्या रांचीतील फार्म हाऊसच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. मात्र आता धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. अशात याबाबत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, “एमएस धोनी आणि त्याच्या कुटुंबीयांना कोणत्या प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत, हे मला माहिती नाही. परंतू, हे योग्य नाही आणि तसं होणं देखील अपेक्षित नाही. धोनी हा असा व्यक्ती आहे, ज्याने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले आहे. तसेच, त्याने त्याच्या एकूण क्रिकेट प्रवासात नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंना सोबत घेतलेले आहे. त्यामुळे त्याला आता अशा प्रकारची वागणूक मिळणे बिलकूल योग्य नाही.”
https://twitter.com/Saj_PakPassion/status/1315339577255776263
या प्रकरणाबाबत यापूर्वी भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही प्रतिक्रिया दिली होती. १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निवृत्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टवर एका युवकाने झिवा धोनीला बलात्कार करण्याची धमकी दिली होती.
https://twitter.com/IrfanPathan/status/1314564522842021889
आयपीएल २०२०मध्ये धोनीच्या चेन्नई संघाने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या या युवकाने धोनी आणि त्याच्या कुटुंबाला धमकी दिली होती.
धोनी सध्या यूएईमध्ये आहे, तर कोव्हिड- १९मुळे त्याची पत्नी झिवा धोनी आणि मुलगी साक्षी धोनी रांचीमध्ये फार्म हाऊसवर राहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक
-धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ; माथेफिरूने दिली होती धमकी
-धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देण्याऱ्या पोस्टवर भडकला पठाण; दिली तीव्र प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?