आयपीएल २०२० मध्ये, “मिड सीझन ट्रान्सफर” नियम सर्व संघ ७ सामने खेळल्यानंतर लागू होणार आहे. या नियमानुसार, आयपीएल २०२० च्या सर्व संघांना पुन्हा संघाची बांधणी करण्याची संधी असेल. आयपीएलच्या फ्रँचायझी फक्त त्या खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात ज्यांनी आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळलेला नाही, किंवा दोन आणि त्याहून कमी सामने खेळले आहेत. तसेच या नियमानुसार याआधी आयपीएल खेळलेल्या पण यंदा आयपीएलचा भाग नसलेल्या काही खेळाडूंना किंवा एखाद्या नव्या खेळाडूला आपल्या संघात फ्रँचायझी घेऊ शकतात. अशाच ४ भारतीय खेळाडू या लेखात जाणून घेऊ.
१. युसुफ पठाण
युसूफ पठाणला आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच तो तीन वेगवेगळ्या संघांकडून आयपीएलचा भाग होता. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांत त्याचा समावेश होता. आयपीएलच्या इतिहासात वेगवान शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. मोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीतुन रोखण्याची आणि विकेट घेण्याचीही शक्ती त्याच्याकडे आहे. ३७ वर्षांचा असलेला युसुफ पठाण पुन्हा एकदा “मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे खेळताना बघायला मिळू शकेल.
हे संघ घेऊ शकतात युसुफला आपल्या संघात –
राजस्थान रॉयल्स –
राजस्थानचा खेळाडू रॉबिन उथप्पाच्या खराब कामगिरीमुळे तसेच यशस्वी जयस्वालला स्वतःला सिद्ध करण्यास आता थोडा वेळ लागेल. त्यामुळे युसूफ पठाण राजस्थान रॉयल्स संघासाठी योग्य खेळाडू ठरू शकतो.
किंग्ज इलेव्हन पंजाब –
या संघाला मधल्या फळीत खेळून संघाला पुढे नेणाऱ्या एका भारतीय खेळाडूची आवश्यकता आहे. त्यात सरफराज आणि मनदीपला संधी दिली गेली. पण ते संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. या संघासाठी युसुफ योग्य खेळाडू ठरु शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज-
इतर संघांप्रमाणेच चेन्नई संघालाही मधल्या फळीतील फलंदाजाची आवश्यकता आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची खराब कामगिरी यंदा चेन्नई संघाच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. तीन वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला या हंगामात युसुफसारख्या फलंदाजाची गरज आहे.
२. आर. विनय कुमार
विनयकडे आयपीएलचा खूप अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये १०५ बळी घेतले आहेत. तो अखेरचा सामना आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. पुडुचेरीकडून मागील देशांतर्गत हंगामात विनयने गोलंदाजी सोबतच फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली.
विनय कुमारकडे अजूनही एक चांगला आणि तंदुरुस्त गोलंदाज म्हणून पाहिला जाते. पण आयपीएल २०२० च्या १३ व्या मोसमाच्या लिलावाच्या वेळी कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. पण आता त्याला या आयपीएलचा भाग होण्याची आणखी एक संधी आहे.
हे संघ घेऊ शकतात विनयला संघात
सनरायझर्स हैदराबाद –
या संघाला आयपीएलमध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला. या संघातील दोन अनुभवी खेळाडूंना आयपीएल २०२० मधेच सोडावे लागले. ज्यात पहिले नाव संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तर दुसरे नाव मिशेल मार्श आहे. त्यांना दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर जावे लागले. विनय संघातील भुवनेश्वरची कमतरता भागवू शकतो, तसेच तो मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. पृथ्वीराज याराचा संघात सनरायझर्सने यापूर्वीच समावेश केला आहे. पण त्यांच्याकडे अजूनही एक संधी आहे.
३. रोहन कदम
कर्नाटकचा रहिवासी असलेला रोहन कदम हा खेळाडू मोठे शॉट्स खेळण्यासोबतच सामना पुढे नेण्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईविरुद्ध शानदार ८१ धावा केल्या. त्या स्पर्धेत त्याने ८०० धावा केल्या होत्या. फलंदाजीबरोबरच तो फिरकी गोलंदाज देखील आहे. डिसेंबर २०१९ ला लिलावात आपल्याला खरेदी केले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. पण त्याला संधी मिळाली नाही.
हे संघ घेऊ शकतात रोहनला संघात
किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज –
या सर्व संघांना एक चांगल्या भारतीय खेळाडूची आवश्यक आहे, जो मधल्या फळीत फलंदाजी करून संघाला समतोल साधून देईल.
४. प्रवीण दुबे
प्रवीण दुबे हा एक युवा फिरकी गोलंदाज आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा नेट गोलंदाज आहे. आतापर्यंत प्रवीणने १४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १६ बळी घेतले आहेत. त्याबरोबरच तो फलंदाजीही करु शकतो. त्यालाही यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
हे संघ घेऊ शकतात प्रवीणला संघात
किंग्ज इलेव्हन पंजाब –
रवि बिश्नोईने आतापर्यंत संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. परंतु एखादा ज्यागाचा फिरकी गोलंदाज संघात असणे ही संघासाठी एक मजबूत बाजू बनू शकते. त्यात प्रवीण हा एक चांगला पर्याय असेल.
चेन्नई सुपर किंग्स –
चेन्नई संघाला सध्या एका भारतीय फिरकीपटूची आवश्यकता आहे. हरभजन सिंगने यंदा आयपीएलमधून माघार घेतली आहे. तसेच अंतिम ११ मध्ये ४ परदेशी खेळाडूच घेण्याची मुभा असल्याने त्यांना इम्रान ताहिर आणि सँटेनरला एकाचवेळी खेळवताही येत नाही. त्यामुळे एक भारतीय फिरकीपटू असण्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रविण दुबेचा ते विचार करु शकतात.
वाचा –
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म