इंडियन प्रीमियर लीग २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन जास्त चांगले राहिलेले नाही. त्यामुळे चाहते चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर खूप निराश झाले आहेत. अशात बुधवारी (७ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला १० धावांनी पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या कृत्यामुळे चाहत्यांचा पारा चढला आणि त्या वापरकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. आता माजी क्रिकेटपटू इरफान पठाननेही या प्रकरणाविषयी त्याचे मत मांडले आहे.
इरफानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकांउटवर ट्विट करत लिहिले की, “आयपीएलमधील सर्व खेळाडू त्यांचे उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काहीवेळा प्रयत्तांनतरही एखाद्याला हवे तसे यश मिळत नाही. यामुळे तुम्ही एका लहान मुलीला अशा धमकी देऊ शकत नाही. तुम्हाला हा अधिकार नाही.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1314564522842021889?s=20
चेन्नईने आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये ६ सामने खेळले आहेत. त्यातील केवळ २ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, शनिवारी (१० ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे चालू असलेल्या सामन्यात संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात २ गुणांची भर पडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब संघामागची साडेसाती संपेना! ८.५ कोटींना टीममध्ये घेतलेल्या खेळाडूला झाली दुखापत
अवघ्या १९व्या वर्षी इगा स्वीएटेकने जिंकली फ्रेंच ओपन
ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते
ट्रेंडिंग लेख-
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित