अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनला पोलंडची 19 वर्षीय खेळाडू इगा स्विएटेकने फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पराभूत करून इतिहास रचला आहे. इगा स्वीएटेकच्या कारकीर्दीतील हे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. पोलंडच्या 19 वर्षीय इगाने अंतिम सामन्यात सोफिया केनिनचा 6-6, 6-1 ने पराभव केला.
A moment to remember.@iga_swiatek #RolandGarros pic.twitter.com/ht8JfwrCHc
— Roland-Garros (@rolandgarros) October 10, 2020
फ्रेंच ओपनचा खिताब मिळविणारी पोलंडमधील ती पहिलीच खेळाडू (पुरुष किंवा महिला) ठरली आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी विजेतेपद जिंकून तिने इतिहास रचला आहे. 1992 नंतर सर्वात तरुण महिला फ्रेंच ओपन चॅम्पियन होण्याचा मान तिने मिळवला.