आयपीएल २०२०चा २४वा सामना शनिवारी (१० ऑक्टोबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असणारा पंजाब संघ केवळ २ धावांनी पराभूत झाला.
तत्पुर्वी पंजाब संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला दुखापत झाली आहे. त्यामुळे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसला नाही. त्याच्याजागी ख्रिस जॉर्डनला संघात स्थान देण्यात आले होते.
कोलकाता-पंजाब संघातील सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी झालेल्या नाणेफेकीनंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने याबाबत माहिती दिली. राहुल म्हणाला की, “कॉट्रेलला दुखापत झाली आहे. त्यामुळे जवळपास पुढील २ सामन्यात तो खेळू शकणार नाही.”
आयपीएल २०२० लिलावात पंजाब संघाने कॉट्रेलला ८.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. या ३१ वर्षीय गोलंदाजाचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या हंगामातील दूसऱ्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने पंजाबकडून ६ सामने खेळत ६ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते
कधीकाळी खेळपट्टी तयार करणारा गाजवतोय आयपीएल, वाचा त्याच्या संघर्षाची कहानी
हा तर सेम ‘गजनी लुक’! एमएस धोनीच्या नव्या लुकला पाहून तुम्हीही असंच म्हणालं
ट्रेंडिंग लेख-
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई