---Advertisement---

हा तर सेम ‘गजनी लुक’! एमएस धोनीच्या नव्या लुकला पाहून तुम्हीही असंच म्हणालं

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 8:27 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा २५वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. या सामन्यापुर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी पुन्हा नव्या लुकमध्ये दिसला. चाहत्यांना धोनीचा नवा लुक खूप आवडल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे नव्या लुकमधील फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

कॅप्टनकूल धोनीने त्याच्या डोक्यावरील केस खूप बारीक केले आहेत. सोबतच त्याने त्याची दाढीदेखील पूर्णपणे कापली आहे. त्यामुळे तो नव्या अंदाजात दिसून आला. काही चाहत्यांनी तर धोनीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘गजनी लुक’ची स्टाईल केल्याचे म्हटले आहे. तर काहींना २०११ सालच्या विश्वचषक विजयानंतर धोनीने केलेल्या लुकची आठवण झाली आहे. युएईत असणाऱ्या उष्णतेमुळे धोनीमुळे हा नवा लुक केला आहे.

https://twitter.com/TM_offi/status/1314910382817906690?s=20

आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत चेन्नईचे ६ सामने खेळले आहेत. त्यातील केवळ २ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे गुणतिलेकत चेन्नई ६व्या क्रमांकावर आहे. बेंगलोरविरुद्धचा सामना जिंकल्यास चेन्नईच्या गुणात २ गुणांची भर पडेल. तर दूसऱ्या बाजूला बेंगलोर संघ ५ पैकी ३ सामने जिंकत पाचव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…

Video: गिल-राणाची बालिश चूक! दोन्ही फलंदाज धावले क्रिजच्या एकाच बाजूला आणि…

१९ वर्षांचे असताना तुम्ही काय झेंडे गाडले होते? यशस्वी जैस्वालवरुन प्रकरणावरुन भडकला माजी क्रिकेटर

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित

फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---