कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा २४वा सामना झाला. शनिवारी (१० ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियम येथे झालेल्या या सामन्याचा निकाल केवळ २ इंचांनी बदलला. नाणेफेक जिंकत कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ६ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या.
कोलकाताच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने १९ षटकात ४ बाद १५१ धावा केल्या. त्यामुळे त्यांना अंतिम षटकात विजयासाठी फक्त १३ धावांची गरज होती. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मनदिप सिंग मैदानावर होते. मॅक्सवेलने चौकाराच्या मदतीने २०व्या षटकातील ५ चेंडूत ७ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर केवळ ७ धावांची गरज होती.
स्ट्राईकवर असेलल्या मॅक्सवेलने संघाला सामना जिंकून देण्याच्या उद्देशाने शेवटच्या चेंडूवर जोरदार शॉट मारला. त्याचा चेंडू हवेतून जात सीमारेषेच्या बाहेरदेखील पडला. मात्र केवळ २ इंचच्या फरकाने षटकारऐवजी तो चौकार ठरला आणि कोलकाताने २ धावांनी बाजी मारली.
https://twitter.com/razz_sanjeet/status/1314929520332296193?s=20
जर शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर असणाऱ्या मॅक्सवेलने मारलेला शॉट षटकार ठरला असता, तर सामना बरोबरीत सुटला असता आणि सुपर ओव्हर खेळावी लागली असती. त्यामुळे पंजाबच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित होताना दिसल्या असत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
१९ वर्षांचे असताना तुम्ही काय झेंडे गाडले होते? यशस्वी जैस्वालवरुन प्रकरणावरुन भडकला माजी क्रिकेटर
जावईबापू जोमात..! आशिया खंडात कोणालाही न करता आलेला विक्रम शोएब मलिकच्या नावावर
कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ‘हे’ खेळाडू गाजवतायत मैदान; म्हणे, एकमेकांसोबत खेळताना वाटतो आनंद
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्यात धोनी, कोहलीसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ