भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल २०२०च्या १३व्या हंगामातून क्रिकेटमधून पुनरागमन करणार आहे. परंतू तो आता केवळ लीग क्रिकेट खेळताना दिसेल.
धोनी कालच रांचीवरुन चेन्नईला आयपीएलसाठी आला. तो रांचीमध्ये राहात असलेल्या फार्महाऊसचे नाव ‘कैलासपती’ असे आहे.
या फार्महाऊसमध्ये नुकताच धोनी बाईक चालवताना दिसला होता. त्यामागे धोनीची मुलगी झिवा (Ziva Dhoni) त्याच्या मागे बसली होती.
धोनीचे हे फार्महाऊस ७ एकरमध्ये पसरलेले आहे. धोनीचे फार्महाऊस रांचीमध्ये आहे. तो मोकळ्या वेळेत येथे वेळ घालवतो.
हे फार्महाऊस इतके प्रशस्त आणि सुंदर आहे की, लोक याकडे आकर्षित होण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. धोनीला आपल्या जून्या घरापासून येथे येण्यासाठी केवळ २० मिनिटे लागतात.
त्याचे बालपन मॅकन कॉलनीमधील २ बीएचके घरात गेले होते. त्याने २००९मध्ये हरमू रोडजवळ ३ मजली इमारत विकत घेतली होती. तो तिथे जवळपास ८ वर्षे राहिला होता. त्यानंतर तो आपल्या नवीन फार्महाऊसमध्ये रहायला आला होता.
धोनीने सर्व सुविधांचा विचार करून हे फार्महाऊस तयार केले होते. यामध्ये ५ स्टार हॉटेल्सइतके मोठे हाॅटेल, इंडोर स्टेडियम आहे. तसेच अप्रतिम स्विमिंग पूलदेखील आहे. धोनीला सराव करण्यासाठी यामध्ये नेट्सचे मैदान देखील आहे.
धोनीने फीट राहण्यासाठी येथे अत्याधुनिक जिमदेखील बनवली आहे. याव्यतिरिक्त धोनीला बाईक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे जवळपास १०० पेक्षा अधिक बाईक्स आहेत. त्याने बक्षिस मिळालेल्या बाईक्सपैकी एकही बाईक विकली नाही. या बाईक्ससाठी स्वतंत्र गॅरेज तयार करण्यात आले आहे. या गॅरेजच्या चारही बाजूंना आरसे आहेत.
याव्यतिरिक्त धोनीच्या या फार्महाऊसच्या चारही बाजूंना हिरवळ आहे. त्याने विविध प्रकारची झाडेही लावली आहेत. लाकूड आणि मार्बलचा वापर त्याने या फार्महाऊसमध्ये उत्तमरित्या केला आहे.
धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच धोनीच्या झिवाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती कचरा उचलत होती. परंतु ३ वर्षात बनलेल्या या फार्महाऊसला बनविण्यासाठी किती रुपयांचा खर्च आला याची माहिती कुणालाही नाही.