धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल

एमएस धोनी आपल्या कुटुंबासह दुबई सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपले कुटुंब आणि काही मित्रांसह दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आला होता. तो बऱ्याच दिवसांपासून दुबईमध्ये आहे आणि कुटुंबासमवेत सुट्टीचा आनंद घेत आहे. धोनीची पत्नी साक्षी या दुबई सहलीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. आजही साक्षीने त्यांच्या या दुबईतील काही आनंद क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दुबईत साजरा केला गेला होता साक्षीचा वाढदिवस

धोनीची पत्नी साक्षीचा वाढदिवसही दुबईमध्ये साजरा करण्यात आला होता. आता तिने दुबईच्या फेम पार्कचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये आणि व्हिडिओंमध्ये साक्षी जिराफ, अस्वलसारख्या प्राण्यांना खायला घालत आहे. यासोबतच या पार्कमध्ये ती सिंहाच्या छाव्याला बाटलीने दूध पाजताना दिसते. साक्षीने या प्राण्यांबरोबर मस्ती करतानाचा एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये धोनीची मुलगी झिवा देखील साक्षीसोबत दिसत आहे. साक्षी आणि झिवा दोघीही या फेम पार्कमध्ये मजा लुटत आहेत. मात्र, या फोटोंमध्ये आणि व्हिडिओंमध्ये एमएस धोनी कोठेही दिसत नाही.

https://www.instagram.com/p/CIfYEEmHomo/?utm_source=ig_web_copy_link

झिवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देखील या सहलीची काही क्षणचित्रे शेअर केली गेली आहेत. यामध्ये देखील झिवा आपली आई साक्षीसोबत दिसतेय.

https://www.instagram.com/tv/CIedxLAHB1t/?utm_source=ig_web_copy_link

यावर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळला गेला. मात्र, कोरोना महामारीमुळे धोनी आपल्या कुटुंबाला युएईमध्ये घेऊन गेला नव्हता. आता आयपीएलनंतर तो सुट्टीसाठी दुबईला आला आहे. आयपीएलच्या या मागील महिन्यात संपलेल्या हंगामात बरेच खेळाडू कुटुंबियांसह युएईला आले होते. सामन्यादरम्यान या खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये त्यांना पाठिंबा देताना दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

लईच भारी! पृथ्वी शॉने घेतला भन्नाट झेल; ऑस्ट्रेलियन कर्णधाराला धाडलं तंबूत, पाहा Video

Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित

‘मी केले ते धोनी इतके वेगवान नव्हते’, सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचे वक्तव्य; पाहा Video

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.