प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम प्लेऑफच्या दिशेने जात आहे. अशात दुबईत शनिवारी (३१ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ५१ वा सामना झाला. हा सामना मुंबईने ९ विकेट्सने जिंकला. प्लेऑफमध्ये सर्वप्रथम स्थान पक्के केलेल्या मुंबईसाठी हा सामना एका वेगळ्याच कारणामुळे खास ठरला.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने
दिल्लीविरुद्धचा हा सामना मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील २००वा आणि टी२० क्रिकेटमधील २२२वा सामना होता. यासह मुंबई संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. मुंबईव्यतिरिक्त सोमरसेट संघाने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २२१ सामने खेळले आहेत.
तर हॅमशायर संघ २१७ टी२० सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. शिवाय ससेक्स (२१२ टी२० सामने) आणि सरे (२११ सामने) हे संघ सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ
प्रतिष्ठित आयपीएलचा सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघ यावर्षीही आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत हंगामातील १३ सामने खेळले असून त्यातील ९ सामने जिंकले आहेत, तर केवळ ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सर्वाधिक १८ गुण आणि १.२९६ नेट रन रेटसह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
तसेच प्लेऑफमधील स्थानही त्यांनी पक्के केले आहे. यासह आयपीएल २०२०मध्ये सर्वात पहिले प्ले ऑफमध्ये जाणारा हा पहिलाच संघ ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ यादीत पटकावलं अव्वल स्थान
काय रे धवन! आधी ठोकली सलग दोन शतके; पण पुढे केला नकोसा विक्रम
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने धोनीला दिला ट्रिब्यूट? सत्य घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला