---Advertisement---

माझा रैनावर काहीही अधिकार नाही, त्याच्या कमबॅकचा निर्णय घेणार हा व्यक्ती

On: गुरूवार, सप्टेंबर 3, 2020 1:00 PM
---Advertisement---

मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा सुरेश रैनाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, सुरेश रैना नक्कीच माझ्या मुलासारखा आहे. पण मला त्याच्याविषयी बोलण्याचा काही हक्क नाही. रैनाच्या परतीचा निर्णय एमएस धोनीच्या नेतृत्वात संघ व्यवस्थापन घेईल.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन सुरुवातीला रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे नाराज झाले होते. त्यानंतर श्रीनिवासन पुन्हा शांत झाले. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात तो पुन्हा परतेल असे संकेतही श्रीनिवासन यांनी यावेळी दिले.

ते पीटीआयशी बोलताना म्हणाले, ”मी रैनाला आपल्या मुलासारखा समजतो. आयपीएलमधील संघाच्या यशाचे कारण हे आहे की, फ्रँचायझीने क्रिकेटच्या बाबतीत कधीही हस्तक्षेप केला नाही. इंडिया सिमेंट्स 60 च्या दशकापासून क्रिकेट चालवत आहे. मी नेहमी असाच राहील.”

श्रीनिवासन यांना जेव्हा सुरेश रैनाच्या परत येण्याविषयी आणि आयपीएलमध्ये खेळण्याविषयी विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, “बघा, कृपया समजून घ्या की रैना परतेल की नाही हे मला माहीत नाही. तो विषय माझ्या कार्यक्षेत्रात नाही. आम्ही संघाचे मालक आहोत, आम्ही फ्रँचायझीचे मालक आहोत, पण आम्ही खेळाडूंचे मालक नाही. संघ आमचा आहे. पण खेळाडू नाही. मी खेळाडूंचा मालक नाही.”

सुरेश रैनाने एका मुलाखतीत आयपीएलमधील त्याच्या भविष्याबद्दल विचारले असता त्याने दुबईमध्ये संघात परतण्याचे संकेत दिले आहे. तो म्हणाला, ”मी क्वारंटाईनच्या काळात प्रशिक्षण घेत आहे. कदाचित आपण मला चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पुन्हा पहाल.”

जेव्हा सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांना रैनाच्या फ्रँचायझी बरोबरच्या भविष्याबद्दल विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की संघ आपल्या सर्व खेळाडूंचे पूर्ण समर्थन करते.

“रैनाने सांगितले होते की तो या हंगामासाठी उपलब्ध नाही. आम्ही आमच्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा देत असतो. त्याने सांगितले होते की त्याच्या काही वैयक्तिक समस्या चालू आहेत. त्यामुळे जेव्हा तो तंदुरुस्त आणि तयार असेल तो परत येऊ शकतो. आम्हालाही हेच हवे आहे,” असे रैनाबद्दल बोलताना विश्वनाथन म्हणाले.

“आम्ही खेळाडूंविरूद्ध कधीच नव्हतो. पुढील हंगामासाठी कोणतीही अडचण नाही. कारण आम्ही आमच्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा दिला आहे,” असेही विश्वनाथन पुढे बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा

-आजवर एकदाही आयपीएल विजेता न ठरलेल्या संघाचा कॅप्टन म्हणतोय, मी रोहित-धोनीकडून नेतृत्त्वाचे धडे गिरवलेत

-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…

ट्रेंडिंग लेख-

-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप

-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

-आयपीएल २०२०मधून माघार घेतलेल्या मलिंगाने केलाय ‘हा’ मोठा विक्रम, सीएसकेच्या एका खेळाडूचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---