इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बॉब विलीस ट्रॉफीचा सामना कोरोना व्हायरसमुळे रविवारी (६ सप्टेंबर) रद्द करण्यात आला आहे. ग्लोस्टरशायर आणि नॉर्थम्पटनशायर यांच्यात हा सामना खेळला जात होता. सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला होता, तेव्हा ग्लॉस्टरशायरने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून ६६ धावा केल्या होत्या.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सांगितले की, “दोन्ही संघाबरोबर झालेल्या सामंजस्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द केला आहे. कोरोनाशी संबंधित प्रकरणाबाबत सावधगिरीने हा निर्णय घेण्यात आला. ”
एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामना रद्द
ईसीबीने म्हटले आहे की, “खेळाडूंसह अधिकारी व इतर कर्मचार्यांचे आरोग्य व सुरक्षा ही ईसीबी आणि प्रथम श्रेणी काउंटीची पहिली जबाबदारी आहे.” मंडळाने या संदर्भात फारशी माहिती दिली नाही. परंतु बीबीसीच्या अहवालानुसार नॉर्थम्पटनशायर संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे सामना रद्द करण्यात आला. बॉब विलीस ट्रॉफी अंतर्गत ४ दिवसीय कसोटी सामना खेळला जात होता.
कोरोना व्हायरस साथीच्या दरम्यान काउंटी चॅम्पियनशिपच्या जागी ही स्पर्धा खेळली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा मोठा सामना झाला रद्द
-पुन्हा खळबळ! चेन्नई पाठोपाठ आता या आयपीएल संघाच्या सदस्याला कोरोनाची बाधा
ट्रेंडिंग लेख-
-टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
-भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
-काय एक एक संघाचे नशीब असते,अन् काय या २ आयपीएल संघाचे नशीब आहे!