मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ घोषित केला आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा अजहर अली यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आलेल्या तीस खेळाडूंमधील वीस खेळाडूंची नावे निवडण्यात आली आहे.
विशेष म्हणजे फवाद आलम याची अकरा वर्षांनंतर पाकिस्तानच्या संघात निवड झाली आहे.
मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, फखर जमान आणि हैदर अली यांना संघात स्थान दिले नाही. ज्यामुळे फवाद दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता वाढली. आहे. या फलंदाजाने आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याने शेवटचा सामना 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. काशिफ भट्टी आणि अनुभवी यासीर शाह या दोन फिरकीपटूंशिवाय दोन अष्टपैलू फहीम अशरफ आणि शादाब खान यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
कोविड 19च्या साथीमुळे इंग्लंडला गेलेल्या पाकिस्तान संघाला वेगवेगळ्या गटात पाठविण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यात पाठवलेल्या 30 खेळाडूंमधून या संघाची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये झालेल्या दोन चार दिवसीय सामन्यांनंतर निवड समितीने 20 सदस्यीय संघाची निवड केली. निवड समितीने कसोटी संघात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद यालाही कायम ठेवले आहे. 5 ऑगस्टपासून मॅनचेस्टर येथे कसोटी मालिका सुरू होईल.
पाकिस्तानचा संघ
अजहर अली(कर्णधार), बाबर आजम(उपकर्णधार), आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इमाम उल हक, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाज आणि यासिर शाह.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम
ट्रेंडिंग लेख-
-सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
-पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती