---Advertisement---

सुरेश रैनाच्या निवृत्तीमुळे पत्नी प्रियंका झाली भावुक; म्हणते…

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 7:13 PM
---Advertisement---

काल (१५ ऑगस्ट) भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी अचानक एमएस धोनीने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. म्हणून, सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. तर, धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाहीत तेवढ्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली.

“माही (एमएस धोनी), तुझ्यासोबत खेळणे हा एक चांगला प्रवास होता. अतिशय अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे,” अशी पोस्ट करत रैनाने सर्वांना त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.

धोनीपाठोपाठ रैनानेही निवृत्ती घेतल्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्याला चाहत्यांनी आणि क्रिकेटपटूंनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशात रैनाची पत्नी प्रियंका रैनानेही तिच्या ट्विटर अकाउंटवरुन भावनिक पोस्ट केली आहे. प्रियंकाने रैनाचे काही फोटो शेअर करत लिहिले की, “मी अजूनही हे पचवत आहे. मी फक्त एवढे सांगू इच्छिते की, मला तुझा खूप अभिमा आहे. माझे हृदय फक्त तुझ्याबद्दलच्या सन्मानाने आणि कृतज्ञतेने भरले आहे.”

यासोबत प्रियंकाने दिल आकाराचे काही इमोजी टाकले आहेत. रैनानेही आपल्या पत्नी प्रियंकाच्या ट्विटवर प्रत्युत्तर दिले आहे. Priyanka Raina Tweet On Husband Suresh Raina Retirement

 

सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळले असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला होता. जरी रैना इथून पुढे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना दिसणार नसला. तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून दमदार प्रदर्शन करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन

जशा शुभेच्छा सेहवागने धोनीला दिल्या, तशा कुणीच देऊ शकलं नाही

गृहमंत्री अमित शहांनी धोनीच्या निवृत्तीवर केलं ट्विट, म्हणाले हेलिकॉप्टर शॉट….

ट्रेंडिंग लेख –

रैना तू मात्र चुकलास…!!!!

आपल्या ‘पहिल्या प्रेमा’मुळे एमएस धोनीने घेतली भारताच्या स्वातंत्र्यदिनी निवृत्ती

ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---