२० जून १९९६ हा दिवस भारतीय क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिणारा ठरला. याच दिवशी इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी कसोटी पदार्पण केले.
या सामन्यात गांगुलीने १३१ तर द्रविडने ९५ धावांची खेळी केली होती. संजय मांजरेकर आणि सुनील जोशी या दोन खेळाडूंच्या जागी या दोघांना संधी देण्यात आली होती.
विशेष म्हणजे कुंबळे, सचिन. द्रविड आणि गांगुलीने एकत्र खेळलेला हा पहिला कसोटी सामना.
पुढे जाऊन सचिन, गांगुली, कुंबळे आणि द्रविड या सर्वांनीच भारताचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं.
द्रविडने त्यानंतर भारताकडून तब्बल १६४ कसोटी सामने खेळले तर गांगुलीने ११३ कसोटी सामने खेळले. आज घडीला द्रविडपेक्षा फक्त ४ खेळाडूंनी जास्त कसोटी सामने खेळले आहेत.
गांगुलीने या सामन्यात शतक करतानाच पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात १ विकेट देखील घेतली होती.
ट्रेंडिंग लेख –
जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन
गोष्ट अशा व्यक्तीची, ज्याने सचिनला एका रात्रीत बनवले करोडपती
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघासमोर लोटांगण घातलेल्या ३ टीम