जगभरातील अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्यस्त असतात. यामध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानचाही समावेश आहे. राशिद नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राशिदने आपल्या आवडत्या बॉलीवूडच्या ३ अभिनेत्रींची नावे सांगितली आहेत.
राशिद बिग बॅश लीग २०२० मध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बीबीएलमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. तो काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. तिथे सध्या तो आपला १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या ब्रेकमुळे क्रिकेट नवीन नियमांसोबत पुन्हा सुरू झाले आहे. अशामध्ये खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आवश्यक क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागतो.
सध्या राशिद हॉटेलमध्ये असल्यामुळे तो बोर होत आहे. अशामध्ये त्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल विचारले. यावर राशिदने ३ अभिनेत्रींची नावे सांगितली.
राशिदने घेतली ‘या’ अभिनेत्रींची नावे
राशिदने आपल्या तीन आवडत्या अभिनेत्रींबद्दल सांगताना अनुष्का शर्मा, प्रीती झिंटा आणि कियारा आडवाणी यांची नावे घेतली. यापूर्वीही राशिदने बॉलीवूडबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्याने दंगल आणि लगान आपले आवडते चित्रपट सांगितले. सोबतच आमिर खानला आपला आवडता अभिनेता असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी राशिद खान आणि अनुष्का शर्माबाबत गुगलवर काही बातम्या येत होत्या. खरं तर गुगलवर राशिद खानची पत्नी असे सर्च केल्यानंतर अनुष्का शर्माचे नाव येत होते. तेही लग्नाच्या तारखेसह.
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग