---Advertisement---

बेंगलोर वि. मुंबई इंडियन्स: विराट आणि रोहितच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी ट्विटरवर उडवली खिल्ली

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 8:09 AM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म काल (28 सप्टेंबर) झालेल्या मुबंई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाला. विराट अवघ्या 3 धावांवर खेळत होता. 13 व्या षटकात फिरकीपटू राहुल चाहर गोलंदाजी करायला आला, त्याने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर विराटला झेलबाद केले. यापूर्वीही झालेल्या दोन्ही सामन्यात विराटलाकाही खास कामगिरी करता आली नव्हती. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात विराटला केवळ 18 धावाच करता आल्या आहेत.

बेंगलोर संघाने केलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना मैदानात सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या कामगिरीने निराश केले. डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरने त्याला झेलबाद केले. त्याला फक्त 8 धावा करता आल्या. तथापि, रोहितने आधीच्या दोन्ही सामन्यात उत्तम फलंदाजी केली होती. चाहत्यांनी बेंगलोर विरुद्धही अशाच कामगिरीची अपेक्षा केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये एकूण 100 धावा केल्या आहेत.

या सामन्यात विराट कोहली पाठोपाठ रोहित शर्माही फ्लॉप ठरला. त्यामुळे खराब कामगिरीनंतर ट्विटरवर दोन्ही फलंदाजांची खिल्ली उडविली जात आहे.

https://twitter.com/ladywithflaws/status/1310612918967234560?s=20

https://twitter.com/BeinggRana45/status/1310606769345818630?s=20

https://twitter.com/JalsaTalks/status/1310610795886125056?s=20

https://twitter.com/SayNoToMediocre/status/1310610759043305473?s=20

https://twitter.com/SaviourDeGea01/status/1310623756088307712?s=20

https://twitter.com/AuntyNational/status/1310623820177313799?s=20

https://twitter.com/ViratSzn/status/1310620562436153346?s=20

बेंगलोर संघांचे सलामीवीर ऍरॉन फिंच आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली सुरुवात केली. अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सनेही तुफान फटकेबाजी केली. फिंचने (35 चेंडूत 52 धावा, 7 चौकार, 1 षटकार) आणि देवदत्त पडिक्कल (40 चेंडूत 54 धावा, 5 चौकार, 2 षटकार) यांनी पहिल्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर डिविलियर्सने 24 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली. शिवम दुबेनेही 2 षटकारांच्या मदतीने 10 चेंडूंत नाबाद 27 धावांची मोलाची कामगिरी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 24 धावांत दोन गडी बाद केले. परंतु वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि जसप्रीत बुमराह यांना एकही गाडी बाद करता आला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---