---Advertisement---

निवृत्ती घेतलेला धोनी आयपीएल खेळणार की नाही, वाचा थोडक्यात

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 8:25 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आज(15 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आज सोशल मीडियावरुन त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डिसेंबर 2003 ला पदार्पण केलेल्या धोनीने 17 हजारांहूनही अधिक धावा केल्या आहेत. पण आज त्याने अखेर थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या आयपीएलमधील खेळण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.

पण 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2020 च्या तयारीसाठी धोनी कालच चेन्नई येथे आला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात धोनी सहभागी झाला आहे.

तसेच धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधारही आहे. याबरोबरच धोनीने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली असल्याचा एक फोटोही त्याचा मित्र आणि संघसहकारी सुरेश रैनाने पोस्ट केला होता. यावरुन तरी धोनी आयपीएलमध्ये यावर्षी खेळणार असल्याची शक्यता दाट आहे.

धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामने खेळले असून ४२.२० च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---