जगभरातील क्रिकेटचाहत्यांसाठी गुरुवारी अत्यंत वाईट बातमी आली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांचे माजी फलंदाज डीन जोन्स यांचं निधन झालं. त्यांना हृदयचा तीव्र झटका आला होता. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला.
डीन जोन्स केवळ क्रिकेटपटूच नाही तर उत्तम समालोचकही होते. ते प्रोफेसर डीनो या नावाने प्रसिद्ध होते. आयपीएल 2020 च्या सामन्यांचे समालोचन करण्यासाठी ते मुंबईत होते. आज आपण त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या अशा काही गोष्टी जाणून घेऊ ज्या खूप कमी लोकांना माहित आहे.
1984 मध्ये केले होते पदार्पण
डीन जोन्सची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात 1984 च्या वेस्ट इंडीज दौर्यासाठी निवड झाली होती. ग्रॅहम यॅलोपच्या जागी त्याचा संघात समावेश झाला होता. जेव्हा डीन जोन्स यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांची तब्येत खराब होती, ते सामना खेळण्याच्या मनस्थितीत नव्हते, परंतु त्यांचा सहकारी खेळाडूही आजारी होता, म्हणून त्यांनी खेळण्याचा निर्णय घेतला. तब्येत खराब असूनही त्यांनी 48 धावांची खेळी केली होती. ते या खेळीला आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी मानयचे.
चेन्नईमध्ये कसोटीत ठोकले दुहेरी शतक
डीन जोन्स यांनी आपल्या कारकिर्दीतील तिसर्या कसोटीत ते एक चॅम्पियन फलंदाज असल्याचे दाखवून दिले होते. सन 1986 मध्ये चेन्नई कसोटीत त्यांनी अतिशय उष्ण वातावरणात दुहेरी शतक ठोकले होते. त्यांनी 210 धावांची खेळी केली होती आणि या खेळीदरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खराब होती. सामना टाय झाला आणि सामना संपल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
सलग दोन दिवस ठोकले दोन शतक
डीन जोन्स यांनी सलग दोन दिवसांत दोन वनडे शतकेही ठोकली होती. त्यांनी 1 जानेवारी 1987 रोजी इंग्लंडविरुद्ध 104 धावा केल्या आणि दुसर्याच दिवशी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 121 धावा केल्या होत्या.
डीन जोन्स यांची क्रिकेटची कारकीर्द
डीन जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी सामने खेळले आहेत आणि या काळात त्यांनी 11 शतके ठोकली. त्यांची सरासरी 46.55 इतकी राहिली होती आणि त्यांनी एकूण 3631 धावा केल्या होत्या. त्यांची कारकीर्द अधिक नेत्रदीपक ठरली असती परंतु त्यांना कसोटी संघातून वगळण्यात आले होते. तथापि त्यांनी प्रथम श्रेणी कारकीर्दीत व्हिक्टोरिया संघासाठी असाधारण प्रदर्शन केले होते. त्यांनी व्हिक्टोरियाकडून खेळताना 19188 धावा केल्या. त्यांचा हा विक्रम कुणीही मोडला नाही. त्यांनी एकूण 55 शतके ठोकली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 324 होती.
एअर होस्टेसशी होते संबंध
2010 मध्ये डीन जोन्स यांनी हा खुलासा केला की, 9 वर्षांपासून एअरहोस्टेसबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते आणि त्यांना मुलगा असल्याचेही त्यांनी उघड केले होते. त्यांनी सांगितले की ते आपल्या मुलाला कधीच भेटले नाही.
वाचा- चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी