या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परंतु या दौऱ्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला स्थान दिलेले नाही. असे असले तरीही रोहित ३ नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो.
या दौऱ्यासाठी बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली होती. या दौऱ्यात रोहित अनुपस्थितीत मर्यादित षटकाच्या मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपविली आहे.
तरीही बीसीसीआयने रोहितच्या फीटनेसबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. परंतु बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, मेडिकल टीम रोहित आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या फीटनेसवर नजर ठेवेल.
यानंतर सोशल मीडियावर रोहितला वगळल्याच्या बातमीबाबत चर्चांना उधान आलं. यादरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, मागील दोन सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सच्या अंतिम अकरामध्ये रोहित हैदराबादविरुद्ध शेवटच्या लीग सामन्यातून स्पर्धेत पुनरागमन करू शकतो.
जर रोहित आयपीएल २०२०च्या हंगामातील प्लेऑफ सामने सुरू होण्यापूर्वी स्पर्धेत परतला, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात परतण्याची त्याची शक्यता वाढू शकते.
पीटीआयशी बोलताना रोहितशी निगडीत सूत्राने सांगितले की, “जर रोहित आयपीएलच्या शेवटच्या आठवड्यात खेळला, तर त्याच्या फीटनेस चाचणीसाठी चांगले असेल. त्यानंतर निवडकर्ता त्याला संघात परत घेण्याबाबत विचार करू शकतात.”
रोहित २३ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर मुंबईच्या अंतिम अकरामधून बाहेर आहे. सामन्यापूर्वी नाणेफेकीसाठी मैदानावर उतरलेला मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने सांगितले होते की, रोहित हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. आणि तो लवकरच फीट होण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहितच्या फॅन्सला ‘ही’ गोष्ट समजणे गरजेचं, माजी क्रिकेटपटूचे संघव्यवस्थापनावर ताशेरे
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांवर झाला अन्याय तर ‘या’ दोन शिलेदारांना लागली लॉटरी
-रोहितने ट्विटर, इंस्टाग्राम बायोमधून काढला ‘इंडियन क्रिकेटर’ टॅग, यामागे नक्की कारण काय?
ट्रेंडिंग लख-
-वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…